मुंबई 08 ऑक्टोबर : मुंबईतील कुर्ला परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली आहे. त्यामुळे अनेक लोक इमारतीत अडकले आहेत. तर काही लोक खिडकीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक दोरीच्या सहाय्याने इमारतीमधून उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
मुंबईतील कुर्ला परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली आहे. त्यामुळे अनेक लोक इमारतीत अडकले आहेत. तर काही लोक खिडकीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत pic.twitter.com/8UqI7xB5S1
— News18Lokmat (@News18lokmat) October 8, 2022
जीव वाचवण्यासाठी हे लोक दोरीचा आधार घेत बाहेर पडत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील टिळक नगर येथे असलेल्या रेल व्हीव या इमारतीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल दाखल होत आहे. आतमध्ये काही रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोठी दुर्घटना! नाशिकमध्ये खासगी बसने घेतला पेट; 10 जणांचा आगीत होरपळून मृत्यू, VIDEO मुंबईतील टिळक नगर रेल व्ह्यू कॉर्पोरेट हाऊसिंग सोसायटीमध्ये ही भीषण आग लागली. 13 मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर दुपारी 2:00 च्या सुमारास एका घराला आग लागल्याने ही घटना घडली. आजूबाजूचे लोक या इमारतीत अडकले आहेत. अग्निशमन गाडी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम करत आहे. घटनास्थळावरील काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये इमारतीच्या तेराव्या मजल्यावर काही लोक दिसत आहेत. तर काही लोक इमारतीच्या खिडकीमधून दोरीच्या सहाय्याने बाहेर येताना दिसत आहेत. ही घटना नेमकी कशामुळे घडली हे अद्याप समोर आलेलं नाही.