जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबईकरांनो जरा जपून! आता डोळ्यांच्या या संसर्गजन्य आजाराचा झपाट्याने प्रसार

मुंबईकरांनो जरा जपून! आता डोळ्यांच्या या संसर्गजन्य आजाराचा झपाट्याने प्रसार

फाईल फोटो

फाईल फोटो

मुंबईमध्ये सध्या आणखी एका संसर्गाचा धोका वाढला आहे. मुंबईत डोळे येण्याची साथ पसरत आहे. शहरात अनेक भागातल्या नागरिकांना सध्या याचा सामना करावा लागत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 10 ऑक्टोबर : आधी कोरोनाचा कहर, मग डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा सामना केलेल्या मुंबईकरांसाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये सध्या आणखी एका संसर्गाचा धोका वाढला आहे. मुंबईत डोळे येण्याची साथ पसरत आहे. शहरात अनेक भागातल्या नागरिकांना सध्या याचा सामना करावा लागत आहे. वातावरणातील बदलामुळे मुंबईकरांना आधीच विषाणूजन्य आजारांनी ग्रासले आहे. अशातच आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. कोरोना पुन्हा आला? देशातील रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक पाणीदार डोळे तसंच डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. या प्रकारची काही लक्षणं सध्या मुंबईकरांमध्ये दिसत आहेत. अशा परिस्थितीत योग्य ती खबरदारी घेत संसर्ग टाळण्याचा आणि संसर्ग झाल्यास त्यावर कोणताही घरगुती उपाय न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यतः आधी एकाच डोळ्याला होतो. मात्र एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही याचा संसर्ग होतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यापासून ही साथ मुंबईत झपाट्याने पसरत आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यानं रुग्णांनी बाहेर जाणं टाळावं, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला आहे. आता सहज ओळखता येणार बनावट औषधं; QR कोडद्वारे काही सेकंदात समजणार काय आहेत लक्षणं - डोळ्यांमध्ये सतत काहीतरी गेल्यासारखं वाटतं. यासोबतच डोळ्यांतून सतत पाणी येतं. डोळे लाल दिसतात आणि डोळ्याच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येते. डोळे चिकट होतात, सोबतच डोळ्यांच्या आतमध्ये खाज येणं, ही तक्रारही जाणवते. संसर्ग झाल्यास काय करावं - संसर्ग झाल्यास डोळ्यांना स्पर्श करणं टाळावं आणि डोळे स्वच्छ पाण्याने वारंवार धुवावे. या काळात प्रवास करणं टाळावं आणि हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दीच्या ठिकाणी किंवा इतरांच्या जवळ जाणं टाळावं. संसर्ग झाल्यास वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात