मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोना पुन्हा आला? देशातील रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक

कोरोना पुन्हा आला? देशातील रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक

फाईल फोटो

फाईल फोटो

आता भारतात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. देशात एकाच दिवसात 2797 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली 08 ऑक्टोबर : मागची दोन वर्षं जगासह भारतात कोरोनाने हाहाकार माजवला. या भयंकर संसर्गजन्य रोगामुळे लाखो जणांना आपला जीव गमवावा लागला. दोन वर्षं कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली जगत असताना यावर्षी संसर्ग आटोक्यात होता. परंतु आता भारतात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. देशात एकाच दिवसात 2797 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही संख्या मागच्या काही दिवसांतल्या रुग्णसंख्येपेक्षा सुमारे 900 पेक्षा अधिक आहे. रुग्णसंख्या वाढत असताना संसर्ग झालेले रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत ही दिलासादायक बाब आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 30 हजारांच्या खाली आली आहे.

  आता सहज ओळखता येणार बनावट औषधं; QR कोडद्वारे काही सेकंदात समजणार

  आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी (8 ऑक्टोबर) संपलेल्या 24 तासांत देशात 2797 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे याच कालावधीत 3884 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 29,251 आहे. डेली पॉझिटिव्हिटी रेट 1.05 टक्के आहे.

  शुक्रवारी (7 ऑक्टोबर) किती रुग्णसंख्या

  शुक्रवारी देशात कोरोनाबाधित नवे 1997 रुग्ण आढळून आले असून, भारतातल्या आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,46,06,460 एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या शुक्रवारी 30,362 होती. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्यांची संख्या 9 आहे. मंत्रालयाने म्हटलं आहे, की एकूण संसर्गग्रस्तांपैकी सक्रिय रुग्ण 0.07 टक्के आहेत, तर राष्ट्रीय कोविड रिकव्हरी दर 98.75 टक्क्यांवर पोहोचला आहे.

  देशात केव्हा किती लाख केसेस आल्या

  7 ऑगस्ट 2020 रोजी देशात कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख होती. 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनाबाधितांची संख्या 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गग्रस्तांची एकूण संख्या 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली होती. 19 डिसेंबर 2020 रोजी देशात एकूण रुग्णसंख्या एक कोटीहून अधिक झाली होती. गेल्या वर्षी, 4 मे 2021 रोजी संसर्गग्रस्तांची संख्या 2 कोटी आणि 23 जून 2021 रोजी ती 3 कोटींवर गेली होती. या वर्षी 25 जानेवारी रोजी कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने चार कोटींचा आकडा पार केला होता.

  First published:

  Tags: Corona spread, Corona updates