जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरेंना चिन्ह अन् नाव दिलं; एकनाथ शिंदे मात्र वेटिंगवर, निवडणूक आयोग म्हणालं...

उद्धव ठाकरेंना चिन्ह अन् नाव दिलं; एकनाथ शिंदे मात्र वेटिंगवर, निवडणूक आयोग म्हणालं...

उद्धव ठाकरेंना चिन्ह अन् नाव दिलं; एकनाथ शिंदे मात्र वेटिंगवर, निवडणूक आयोग म्हणालं...

एकनाथ शिंदेंना कधी मिळणार चिन्ह?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 10 ऑक्टोबर : गेल्या अनेक दिवसांपासून ज्यावर चर्चा सुरू होती, अखेर त्याची मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाकडून शिंदे आणि ठाकरे गटासाठी चिन्ह आणि पक्षाचं नवं नाव जाहीर केलं आहे. मात्र या निर्णयानंतर ठाकरे गटाला जबर धक्का बसला आहे. कारण शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हा नाव देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र शिंदे गटाला अद्याप कोणतंही चिन्ह देण्यात आलेलं नाही. निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाकडे आणखी तीन चिन्हाचा पर्याय मागवण्यात आला आहे. त्यानंतरच शिंदे गटाला नवं चिन्ह मिळणार आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही तीन चिन्ह पाठवण्यात आली, तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाला मिळालं बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव शिंदे गटाकडून सुद्धा उगवता सूर्य, गदा आणि त्रिशूळ ही तीन पक्ष चिन्ह मागण्यात आली होती. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी 3 नावं शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पाठवली आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात