मुंबई, 10 सप्टेंबर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अनोख्या शैलीत CNN News18 येथे संवाद साधला. नेटवर्क18 च्या TOWN HALL या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांची मुलाखत घेण्यात आली होती. पहिल्या सत्राची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदेंसोबत सरकार स्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलं. उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला होता. परिणामी त्यांचा पक्षाशी कमी कनेक्ट असल्यामुळे थेट 40 आमदार फुटले. त्यामुळे शिवसेना फुटण्यामागे दुसरं तिसरं कोणी नसून स्वत: उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. मुंबईला शांघाय बनवणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सारेच अचंबित यावेळी फडणवीसांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. मोदी कधी ओरडले आहेत का, असा सवाल केल्यानंतर फडणवीस म्हणाले की, घरातील मोठी माणसं ओरडत असतात. त्यामुळे मोदीही ओरडले आहेत. याशिवाय जेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी केली होती, त्यावेळी ते कशातच सहभाग घेणार नसल्याचं ठरवलं होतं. बाहेर राहून काम करणार असल्याचा त्यांचा निर्णय होता. फडणवीस म्हणाले की, मी कोणतंही पद घेणार नसल्याचं सार्वजनिकपणे सांगितलं होतं. मात्र त्यानंतर पक्षश्रेष्ठीकडून उपमुख्यमंत्रिपद घेण्याबद्दल सांगण्यात आलं. ती 5 मिनिटं माझ्यावर खूप ओझं होतं. कारण मी आधीच याबाबत घोषणा केली होती. मात्र यानंतर मोदींच्या चार शब्दानंतर सर्व स्पष्ट झालं.
"I knew that Eknath Shinde will be the CM because I was one of the people who took this decision": Maharashtra Deputy CM @Dev_Fadnavis
— News18 (@CNNnews18) September 10, 2022
Watch #CNNNews18Townhall LIVE now: https://t.co/14A5PMJZkF | #Maharashtra #DevendraFadnavis pic.twitter.com/aIIuwKHzlI
सरकारच्या बाहेर राहून काम केलं जात नाही. सरकारला ताकद देण्यासाठी पक्षाने उपमुख्यमंत्रिपद घेण्यास सांगितलं. फडणवीस या नावाला पक्षामुळेच महत्त्व आहे. जर पक्षाच्या हितासाठी मला उपमुख्यमंत्रिपद घेण्यास सांगितलं तर मला त्याचा स्वीकार करायला हवा. मात्र मोदींच्या चार शब्दानंतर सर्व प्रकरण स्पष्ट झालं, असं ते यावेळी म्हणाले.