मुंबई 17 नोव्हेंबर : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन वंदन केलं. मुख्यमंत्री स्मृतीस्थळावर गेल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिकडे आले आणि त्यांनी गोमूत्र शिंपडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं. यावर आता शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. या दिवशी कुठलाही वाद निर्माण होऊ नये असे बघावे, असं आवाहन त्यांनी केलं. ‘ढोंगी प्रेम दाखवू नका, सावरकर आणि बाळासाहेबांना भारतरत्न द्या’, राऊतांचा फडणवीसांवर पलटवार केसरकर म्हणाले, की काल आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गेले होतो. दर्शन घेतले. त्यानंतर काही लोकांनी गोमूत्र शिंपडले, हे चुकीचे आहे. बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली महाराष्ट्र घडवून देता येणार आहे. बाळासाहेबांचे स्वप्न होते की शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा..तो झालाय, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. केसरकर म्हणाले, की बाळासाहेबांची शिवसेना ही आमचीच आहे. म्हणूनच आम्हाला नावही मिळाले आहे. आम्हाला पंतप्रधानाचा पाठिंबा आहे. उद्धव ठाकरेंना टोला लगावत ते म्हणाले, की सत्तेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर गेलात हे समजू शकतो. पण सत्ता गेल्यावरही तुम्ही सोबत आहात. आता सगळीकडे सांगत सुटता की आम्ही खोके घेतले. आम्ही तुम्हाला म्हणालो होतो, बाळासाहेबांच्या विचारांना तेलांजली देवू नका. भाजपबरोबर या. पण तुम्ही काही केले नाही, असंही केसरकरांनी यावेळी बोलून दाखवलं. नारायण राणे नरमले, BMC चा जेसीबी येण्याआधीच बंगल्यावर स्वत: चालवला हातोडा! सावकरांबाबतही त्यांनी यावेळी मत मांडलं. सावरकर यांना भारतरत्न द्या ही आमची पूर्वीपासूनची मागणी आहे.महाविकास आघाडीच्या काळात हा प्रस्ताव आला होता. मात्र, त्याला कारण देत पाठिंबा दिला नव्हता. सावरकरांना भारतरत्न द्यायला विरोध कुणाचा आहे हे जगजाहीर आहे. राहुल गांधी सावरकरांबद्दल काहीही बोलतात आणि एक युवा नेता जाऊन त्यांना मिठी मारतो. हे वाईट आहे, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







