मुंबई, 21 ऑक्टोबर : यंदा 10 वर्षपूर्ती म्हणून मनसेने शिवाजी पार्कात मोठ्या थाटामाटात दीपोस्तवाचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी आपल्या अनोख्या शैलीत दीपोस्तवाची सुरुवात केली. यानंतर उपमुख्यमंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री बोलेल. यावेळी दोन्ही आजोबींना आपल्या नातूची आवर्जून आठवण काढली. नातू हा दोघांचाही आवडीचा विषय असल्याचं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगितलं होतं की, दीपोस्तव इतक्या थाटामाटात करण्यामागे नातू आहे का? यावर राज ठाकरेंनीही मिश्किलपणे उत्तर दिलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्टेजवर उपस्थित सर्वांचा उल्लेख करताना राज ठाकरेंच्या नातूचाही आवर्जुन उल्लेख केला.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - सर्वांनाच दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या संकल्पनेतून दिपोत्सव मागील 10 वर्षांपासून आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर सर्व मान्यवर सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा देताना आनंद होतोय. मागील 2 वर्ष कोरोनामुळे आपल्याला अनेक सण इच्छा असूनही मर्यादेमुळे साजरा करता आले नाही. सर्वांना सोबत घेऊन राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी करताय, मी त्यांचं अभिनंदन करतो. आपण दिवाळीमध्ये अनेक ठिकाणी सर्वजण आपापल्या परीने दिवाळीचा उत्सव साजरा करत असतो. यावर्षी आम्ही सर्व उत्सव जोरात करायचे ठरवले. तसेच ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करतोय. गणपतीमध्ये, नवरात्रीमध्ये लोकांनी खूप आनंद घेतला. सर्वजण दबून बसले होते. मात्र, आता थोडा मोकळा श्वास घेतला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तुम्ही रात्री, अपरात्रीही भेटायला आला तरी आम्ही भेटणार, नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला दिवाळीची चांगली सुरुवात आहे. आनंद घेऊया. आम्ही ठरवलंय की, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. कष्टकऱ्यांचे, कामगारांचे आणि प्रत्येक माणसाचं हे सरकार आहे. आम्ही नेहमी आपल्याला सांगितलंय की, कधीही आपण हक्काने आम्हाला सांगा, काहीही सूचना असतील शेवटी तुमचं काही वैयक्तिक काम नसते. तुम्हाला अनेक लोक भेटत असतात, तुम्हाला विनंती करु शकतात आणि सरकारच्या माध्यमातून आपण ते सोडवू शकतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंना म्हणाले.