मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसैनिकांची थेट पोलीस चौकी ताब्यात घेण्यापर्यंत मजल, उल्हासनगरमधील Video पाहून नागरिक संतापले

शिवसैनिकांची थेट पोलीस चौकी ताब्यात घेण्यापर्यंत मजल, उल्हासनगरमधील Video पाहून नागरिक संतापले

 राज्यात महाविकास आघाडी सरकार असून या महाविकास आघाडीमधील शिवसेना (Shivsena) हा प्रमुख पक्ष आहे. मात्र याच शिवसेना पक्षाच्या शिवसैनिकांची आता तर थेट पोलीस चौकी ताब्यात घेण्यातपर्यंत मजल गेल्याचं समोर आलं आहे.

उल्हासनगर, 15 मार्च : राज्यात महाविकास आघाडी सरकार असून या महाविकास आघाडीमधील शिवसेना (Shivsena) हा प्रमुख पक्ष आहे. मात्र याच शिवसेना पक्षाच्या शिवसैनिकांची आता तर थेट पोलीस चौकी ताब्यात घेण्यातपर्यंत मजल गेल्याचं समोर आलं आहे. उल्हासनगरजवळ म्हारळ परिसरात असलेली पोलिस चौकी शिवसैनिकांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच काय तर चौकीला झेंडे देखील लावले. ही बाब टिटवाळा पोलिसांना कळताच पोलिसांनी या शिवसैनिकांना रोखत त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढले. दरम्यान या सगळ्या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेमकी आता शिवसैनिकांनी ही पोलीस चौकी कोणत्या आधारावर ताब्यात घ्यायला लावली होती हे अजून कळू शकलेले नाही.

मात्र या व्हायरल व्हिडिओमध्ये म्हारळ शिवसेना शहर प्रमुख डॉ. सोमनाथ पाटील, नंदू म्हात्रे हे शिवसेनेचे पदाधिकारी पोलिसांशी हुज्जत घालतांना दिसत आहेत. दरम्यान २० ते २५ वर्षांपूर्वी इथल्या ग्राम पंचायत सदस्य विलास देशमुख यांनी पोलिसांना बसायला जागा नसल्याने पोलीस चौकी उभारून दिली होती.

हे ही वाचा-फडणवीसांनी टाकला आणखी एक खळबळजनक पेनड्राइव्ह बॉम्ब; कुणाचे आहेत दाऊदशी संबंध?

मात्र आता एका बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांना दुसरी पोलीस चौकी उभारून दिली आहे. त्यामुळे या चौकीत पोलिसांचे जास्त येणे जाणे नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी आता या पोलीस चौक ताब्यात घेत इथे शिवसेना शाखा उभारण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार शिवसैनिकांनी तिथे शिवसेनेचे झेंडे लावले अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान आता टिटवाळा पोलिस आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यात पोलीस ठाण्यात या प्रकरणी चर्चा सुरू आहे. शिवसैनिकांचा चौकी ताब्यात घेण्याचा कोणता प्रयन्त नव्हता, ती चौकी आमच्या पदाधिकारी यांनी २० ते २५ वर्षापूर्वी बांधून दिली होती, आता पोलिसांना नवी पोलीस चौकी मिळाली आहे. त्यामुळे जुन्या पोलीस चौकीची जागा कोणाला न देता पुन्हा नागरिकांच्या कामासाठी द्यावी अशी आमची मागणी असल्याचे उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगीतले. तर गैरसमजुती मधून हा प्रकार झाला असून पोलिसांची प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला आहे.

First published:

Tags: Police, Shivsena, Ulhasnagar