जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी राज्य सरकारचा डाव'; भारनियमनाच्या संकटावरुन बावनकुळेंचा गंभीर आरोप

'काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी राज्य सरकारचा डाव'; भारनियमनाच्या संकटावरुन बावनकुळेंचा गंभीर आरोप

'काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी राज्य सरकारचा डाव'; भारनियमनाच्या संकटावरुन बावनकुळेंचा गंभीर आरोप

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की राज्याचा ऊर्जा विभाग हा काँग्रेसकडे आहे. जनतेचा रोष त्यांच्यावर निर्माण व्हावा यासाठी राज्य सरकारकडून ऊर्जा विभागाला पैसा दिला जात नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 14 एप्रिल : राज्यावर सध्या कोळशाअभावी भारनियमनाचं संकट घोंघावत आहे. अनेक विजनिर्मिती केंद्रांमध्ये कोळसाचा साठा अगदी 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे, त्यामुळे नागरिकांवर लोडशेडिंगचा सामना (Load Shedding in Maharashtra) करण्याची वेळ आली आहे. अशात राज्य सरकारने काँग्रेसबाबत जनतेच्या मनात रोष निर्माण व्हावा यासाठी मुद्दाम हे सगळं केल्याचा गंभीर आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. Kirit Somaiya : ‘उद्धव ठाकरेंचे डझनभर घोटाळे बाहेर काढणार’, हायकोर्टाच्या दिलासानंतर सोमय्या पुन्हा मैदानात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की राज्याचा ऊर्जा विभाग हा काँग्रेसकडे आहे. जनतेचा रोष त्यांच्यावर निर्माण व्हावा यासाठी राज्य सरकारकडून ऊर्जा विभागाला पैसा दिला जात नाही. राज्य सरकारच्या अर्थ मंत्रालयाने ऊर्जा विभागाचा कॅश फ्लो बिघडवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे रेल्वे, एनटिपीसी, डब्ल्यूसीएल, खासगी कंपन्या यांचं थकीत वाढलं आहे. त्यामुळे राज्य विजेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले, की केंद्राकडे बोट दाखवून काही होणार नाही तर राज्य सरकारमधील झगड्यामुळे राज्याला लोडशेडींगचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसबद्दल जनतेच्या मनात रोष निर्माण करण्यासाठी राज्य सरकारच हे सगळं करत असल्याचा आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. Load Shedding : वीज निर्मितीत घट; कोळशाअभावी राज्यावर भारनियमाचं मोठं संकट; इतकाच साठा शिल्लक विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये सर्वच ग्राहकांना विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात भारनियमाचं संकट टाळण्यासाठी महावितरणकडून (Mahavitaran) शर्थीचे प्रयत्न सुरु असले तरी राज्यातील वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने वीज केंद्रे ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत (Load Shedding Latest Updates). भुसावळ येथील दीपनगर वीज निर्मिती केंद्रात एक दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. टंचाई भासल्यास एक संच बंद करावा लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात