Home /News /mumbai /

Kirit Somaiya : 'उद्धव ठाकरेंचे डझनभर घोटाळे बाहेर काढणार', हायकोर्टाच्या दिलासानंतर सोमय्या पुन्हा मैदानात

Kirit Somaiya : 'उद्धव ठाकरेंचे डझनभर घोटाळे बाहेर काढणार', हायकोर्टाच्या दिलासानंतर सोमय्या पुन्हा मैदानात

किरीट सोमय्या आज संध्याकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपला न्यायपालिकेवर विश्वास असल्याची भावना व्यक्त केली.

    मुंबई, 13 एप्रिल : आयएनएस विक्रांत (INS Vikrant) निधी अपहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) आज मोठा दिलासा दिला. त्यानंतर काल नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या आज संध्याकाळी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) दाखल झाले. त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपला न्यायपालिकेवर विश्वास असल्याची भावना व्यक्त केली. तसेच न्याय मिळायला आता सुरुवात झाली आहे, असं सोमय्या यावेळी म्हणाले. सोमय्या यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला. किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले? "मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे मी आभार मानतो. मुख्यमंत्र्यांचं काम फक्त पोलिसांना माफियागिरी करायला लावायची, खोटा एफआयआर दाखल करायला लावायचा, अटक करुन जेलमध्ये टाकण्याची भाषा वापरायची, हे महाराष्ट्रात पहिल्यांदा होतंय. विक्रांत काय आम्ही कोणताही घोटाळा केलेला नाही. संजय राऊतांनी 58 कोटींची भाषा वापरली होती. त्यांनी केलेल्या आठही आरोपांमध्ये एकही कागद नव्हता, एकही पुरावा नव्हता. फक्ट स्टंटबाजी करायची. माझा न्यायालयावर विश्वास आहे. न्याय मिळाला सुरुवात झाली आहे", असं किरीट सोमय्या म्हणाले. "गेल्या चार-पाच दिवसांपासून जे नाटक सुरु होतं ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं. शिवसेना नेते संजय राऊत हे प्रवक्ते आहेत. मास्टरमाईंड तर उद्धव ठाकरे आहेत. कारण ठाकरेंच्या मुलाचे आणि पत्नीचे घोटाळे ज्यावेळी बाहेर यायला लागले त्यावेळी कसंही करुन किरीट सोमय्याला जेलमध्ये टाका. त्याचं तोंड बंद करा, असे प्रयत्न सुरु होते. उद्धव ठाकरे साहेब आपले डझनभर घोटाळे बाहेर काढणार. शिक्षा होईपर्यंत किरीट सोमय्या सक्रिय राहील", असा इशारा सोमय्यांनी दिला. (गुणरत्न सदावर्तेंना झटका, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सरकारी वकिलांचे कोर्टात धक्कादायक खुलासे) "मला न्याय मिळायला वेळ लागला असेल. पण न्याय मिळायला सुरुवात झाली आहे. मला अटकेपासून संरक्षण मिळणं महत्त्वाचं नाही. न्यायालयाने जे प्रश्न उपस्थित केलेत ते महत्त्वाचे आहे. 58 कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे काय? संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील आरोपांवरुन गुन्हा दाखल होतो", असंदेखील ते यावेळी म्हणाले. नेमकं प्रकरण काय? आयएनएस विक्रांत (INS Vikrant) निधी अपहार प्रकरणात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली. किरीट सोमय्यांच्या या अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी झाली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अर्जावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने एक मोठा दिलासा त्यांना दिला आहे. सुनावणीपर्यंत अटक करु नये असं कोर्टाने म्हटलं आहे. किरीट सोमय्यांचे वकील अ‍ॅडवोकेट विवेकानंद गुप्ता यांनी सांगितले की, किरीट सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे. 18 तारखेपासून 4 दिवस EOW मध्ये चौकशीसाठी हजर रहावे लागेल. अटक झाल्यास 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात येईल. प्राथमिकदृष्ट्या 57 कोटी रुपये गोळा केले याचे पुरावे दिसत नाहीत. 2013 मधील हे प्रकरण आहे. मग 2022 मध्ये गुन्हा दाखल का झाला? या मुद्द्यांवर अंतरिम संरक्षण मिळाले आहे. किरीट सौमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होतो. यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवली माहिती होती. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले. (नवाब मलिकांची संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई) या प्रकरणी माजी सैनिक बबन भीमराव भोसले यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. किरीट सोमय्या, निल सोमय्या आणि त्यांचे इतर साथीदार याविरुद्ध अर्ज केला आहे. INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी, करोडोंचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. 2013 मध्ये खासदार असताना निधी गोळा केल्याचा आरोप सोमय्यांवर करण्यात आळा आहे. किरीट सोमय्या यांनी राष्ट्राची आणि जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे किरीट आणि निल सोमय्या या पितापूत्रांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी बबन भोसले यांनी केली आहे. भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका “आयएनएस विक्रांत’चा 60 कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. 1961 मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 60 कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या