जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात शिंदे व फडणवीस सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करतंय

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात शिंदे व फडणवीस सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करतंय

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात शिंदे व फडणवीस सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करतंय

शिंदे आणि फडणवीस यांनी मिळून सरकार स्थापन केल्यापासून महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. (Chandrashekhar Bawankule)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 सप्टेंबर : एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीला पायउतार व्हावे लागले. यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी मिळून सरकार स्थापन केल्यापासून महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे.  दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी नवीन नियुक्त झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यास सुरु केले आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, आता शिंदे व फडणवीस सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करत आहे यामुळे विरोधकांना हे जड जात असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात

एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप युतीचे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 45 वर खासदार आणि विधानसभेत 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात राज्य सरकारचे अस्तित्व नव्हते. आता शिंदे व फडणवीस सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करत आहे, असे ते म्‍हणाले.

हे ही वाचा :  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मोदी, शाहांची उपस्थिती? का लांबला मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा?

मविआने वैधानिक विकास मंडळे बरखास्त केली. त्यांना मुदतवाढ दिली नाही. उलट 12 आमदारांच्या नियुक्त्यांशी त्यांचा संबंध जोडला. 12 आमदार नियुक्त करा मग विकास मंडळे पुनरुज्जीवित करतो अशी मागास भागांविरोधी भूमिका घेतली अशी टीका बावनकुळे यांनी केली.

राज्यात विधानसभा निवडणुका घ्या असे उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना दिलेले आव्हान हे सूर्याला दिवा दाखविण्यासारखे असल्याचा टोला त्यांनी लगावला. शिक्षक मुख्यालयी राहण्याच्या आमदार प्रशांत बम्ब यांच्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा आहे काय असे विचारले असता, केवळ शिक्षकच नव्हे तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहायला पाहिजे. मात्र बंब यांनी शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करण्याची केलेली मागणी वैयक्तिक असल्याचे बावनकुळे म्हणाले.

जाहिरात

हे ही वाचा :  Satara : लम्पी आजाराचा बैलगाडा शर्यतीवर परिणाम, लाखोंचं नुकसान होण्याची भीती Video

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचीही टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये “बाप चोरणारी टोळी” असा शिंदे गटाचा उल्लेख केला होता. त्यावर बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष आहेत आणि महापुरुष हे कुणा एकट्याचे नसून ते देशाचे असतात. अशा महापुरुषांचा आदर्श जोपासून त्यावर मार्गक्रमण करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे बाप कधीही चोरता येत नसतो हे सर्वांनी लक्षात ठेवावं’, असं बोलत आमदार गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात