मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Building Slab Collapse : धक्कादायक! इमारतीचे काम चालू असताना स्लॅब कोसळला एकाचा मृत्यू

Building Slab Collapse : धक्कादायक! इमारतीचे काम चालू असताना स्लॅब कोसळला एकाचा मृत्यू

file photo

file photo

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळ्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. (Building Slab Collapse)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 25 ऑगस्ट : उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळ्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. (Building Slab Collapse) उल्हासनगर येथील कोमल पार्कमधील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही दुर्घटना घडली आहे. ही माहिती महापालिका प्रशासनाला समजताच महापालिका अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. यामध्ये अजून काहीजण अडकले आहेत का? याची माहिती अधिकारी घेत आहेत. ही घटना अचानक घडल्याने काहीजणांची तारांबळ उडाली. तर इमारतीच्या बांधकामावर ही शंका व्यक्त करण्यात आली.

उल्हासनगरमध्ये वर्षभरात स्लॅब कोसळल्याच्या सहा दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. कॅप नंबर दोनच्या गोल मैदान परिसरातील कोमल पार्क या इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळून एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झालाय.

हे ही वाचा : Raju Srivastav Health Update:तब्बल 15 दिवसानंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. इमारतीमध्ये एकूण २० पेक्षा जास्त फ्लॅट असून सर्व कुटुंबांना इथून बाहेर काढण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. गेल्या वर्षभरात उल्हासनगर शहरांमध्ये पाच ते सहा दुर्घटना घडल्या असून त्यात १३ जणांचा असाच बळी गेला आहे. 

इथे देखील सहाव्या मजल्याचा स्लॅब पाचव्या मजल्यावर  कोसळला. या फ्लॅटमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळते आहे.  उल्हासनगरच्या कोमल पार्कमध्ये झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

हे ही वाचा : Maharashtra TET Scam : टीईटी घोटाळा प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचेच नाव, थेट शिक्षणाधिकाऱ्यांनीच दिले स्पष्टीकरण

याबाबत अद्यापही प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे अधिकारी रेक्यू करण्यासाठी पोहोचले आहेत. दरम्यान यामध्ये आणखी कोणाला दगाफटका झाला आहे का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी किती लोक दबले आहेत याचीही माहिती समोर आली नाही.

First published:

Tags: Mumbai, Person death, Thane building collapse