मुंबई, 05 ऑक्टोंबर : शिवसेनेचा दसरा मेळावा अगदी काही तासांवर येऊन ठेपला असतानाच मुंबईतील बीकेसी मैदान येथे मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची तयारी सध्या पाहायला मिळत आहे. येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला भरपेट पौष्टिक नाश्ता मिळावा यासाठी शिंदे गटाने चविष्ट फुड बॉक्स देण्याची तयारी सुरु केली असून जवळपास अडीच लाख फूड बॉक्स तयार करून घेण्याची ऑर्डर ठाण्यातील सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर या दुकानाला देण्यात आली आहे.
एक पक्ष, एक नेता, एक मैदान असे बिरुद मिरवणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आता एक वेगळे स्वरूप लाभले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुंबईत दोन दसरा मेळावे होणार आहेत. त्यातील मुंबईतील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली दसरा मेळावा होणार असून त्यासाठी मोठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या BKC येथीस दसरा मेळावा करता येणाऱ्यांसाठी खास जेवणाचे पॅकेट pic.twitter.com/ArpmRvtvvI
— News18Lokmat (@News18lokmat) October 5, 2022
हे ही वाचा : Dasara Melava : रस्त्यावर भिडले अन् विमानातला आजूबाजूला बसले, शिवसेना नेत्याचा आणि शिंदे गटाच्या मंत्र्याचा VIDEO
राज्यभरातून येणाऱ्या लाखो शिवसैनिकांना पोटभर चविष्ट नाष्टा मिळावा यासाठी ठाण्यातील सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर या दुकानाला अडीच लाख फूड बॉक्सची ऑर्डर देण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरच ही जबाबदारी टाकण्यात आल्याने सरनाईक या सर्व तयारीवर जातीने लक्ष ठेवून आहेत.
या फुड बॉक्स खिचडी, पुलाव, समोसा, वडापाव असे खराब होणारे पदार्थ न देता त्यामध्ये धपाटे अथवा थेपला कचोरी गुलाबजाम असे चविष्ट पदार्थ देण्यात आले असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या BKC येथीस दसरा मेळावा करता येणाऱ्या शिवसैनिकांसाठी ठाण्यातून हजारो जेवणाचे पॅकेट पाठवण्यात येणार आहेत. सुप्रसिद्ध प्रशांत कॅार्नर यांनी हे फूड पॅकेट बनवले असून सर्व जेवणाची तयारी झाली असून पॅकेट मेळाव्यासाठी देण्यात येणार आहे.
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांची ‘मोदी स्टाईल’, दसरा मेळाव्यात पुन्हा ठाकरेंवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणार!
हे फूड पॅकेट BKC येथे रवाना केले जातील. राज्यभरातून प्रवास करुन जवळपास ३ लाख शिंदे समर्थक शिवसैनिक BKC येथे येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी ही सोय करण्यात आली आहे.