जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bhaskar Jadhav vs BJP : भास्कर जाधवांच्या विरोधात भाजप आक्रमक, बॅनरबाजी करत डिवचलं, माहीमधील बॅनरची चर्चा

Bhaskar Jadhav vs BJP : भास्कर जाधवांच्या विरोधात भाजप आक्रमक, बॅनरबाजी करत डिवचलं, माहीमधील बॅनरची चर्चा

Bhaskar Jadhav vs BJP : भास्कर जाधवांच्या विरोधात भाजप आक्रमक, बॅनरबाजी करत डिवचलं, माहीमधील बॅनरची चर्चा

भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईत भाजपकडून बॅनरबाजी करत जोरदार टीका केली आहे. भाजपकडून माहीममध्ये आपण यांना पाहिलत का? अशा आशयाचे बॅनर लावले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 ऑक्टोबर : संजय राऊत यांच्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमक बोलणारे नेते म्हणून भास्कर जाधव यांचे नाव घेतले जाते. भास्कर जाधव ज्या सभेला जातील त्या सभेत जोरदार टीका करताना पहायला मिळतात. यावरून शिंदे गट आणि भाजपचे नेतेही त्यांना प्रत्त्युत्तर देत असतात. दरम्यान भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईत भाजपकडून बॅनरबाजी करत जोरदार टीका केली आहे. भाजपकडून माहीममध्ये आपण यांना पाहिलत का? अशा आशयाचे बॅनर लावले आहेत.

जाहिरात

मागच्या काही दिवसांपासून भास्कर जाधव भाजप आणि शिंदेगटाच्या नेत्यांवर जोरदार टीका करताना दिसत आहे. यावरून भाजपने भास्कर जाधव यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. भाजपकडून मुंबईत भास्कर जाधव यांच्या विरोधात बॅनर बाजी करण्यात आली आहे. आपण यांना पाहीलात का ? शोधून आणणाऱ्याला 11 रू बक्षीस अशा अशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप आक्रमक होत, माहीम परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. यावरून भाजप आणि ठाकरे गटात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :  ‘राष्ट्रवादीचे 10-12 आमदार शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात’, पण निर्णय कधी?

भास्कर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तडीपार मोर्चानंतर NRI आणि सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.कारण आधीच त्यांच्यावर इतर ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत. अशात आता भास्कर जाधव आणि इतरांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

जाहिरात

या नेत्यांवर गुन्हा दाखल

मोर्चात अरविंद सावंत, भास्कर जाधव, विनायक राउत, अंबादास दानवे, राजन विचारे, केदार दिघे, मनोहर भोईर, बबन पाटील, चंद्रकांत डोलारे, भारत पाटील, अनिता बिर्जे, सुनिल प्रभु, नरेश रहाळकर, या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा :  ‘तीन महिन्यांपूर्वी आम्हीही बॅटिंग केली, काहींचा अप्रत्यक्ष आशिर्वाद,’ पवारांसमोर काय बोलले एकनाथ शिंदे?

जाहिरात

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला

शिवसेनेचे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर मंगळवारी रात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या चिपळूण येथील घराबाहेरील पटांगणात उभ्या असलेल्या कारजवळ दगडांसह इतर वस्तू आढळून आल्या आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर चिपळूण पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.घटनेनंतर गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला हल्ल्याच्या प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. चिपळूण पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. या सगळ्याप्रकरणी हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात