मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Ashish Shelar BJP : उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी म्हणजे हा एक उठाव, आशिष शेलारांच्या वक्तव्याने खळबळ

Ashish Shelar BJP : उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी म्हणजे हा एक उठाव, आशिष शेलारांच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका काही काळात लागणार असल्याने आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका काही काळात लागणार असल्याने आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका काही काळात लागणार असल्याने आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 ऑक्टोबर : महाविकास आघाडीची सत्ता पालट झाल्यापासून भाजपच्या नेत्यांकडून ठाकरे गटातील नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर नेहमी टीका करत असतात. शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट शिवसेनेत पडल्याने खरी शिवसेना शिंदे गटाची असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका काही काळात लागणार असल्याने आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

शेलार वरळी दौऱ्यावर असताना म्हणाले कि, वरळीत विधानसभेच्या निमीत्ताने आदित्य ठाकरे आत्ता आत्ता या मतदार संघात फिरत आहेत. यामुळे त्यांना मराठी माणसाच्या मनातील भाव कसे समजणार. भाजप आणि मराठी जनता अशी एक वेगळी घट्ट नाळ जमली आहे. म्हणून आम्ही दिवाळी निमीत्त 233 ठिकाणी कार्यक्रम ठेवले आहेत.

हे ही वाचा : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, दिपाली सय्यद शिंदे गटात सामील होणार?

मुंबईत आता दिवाळीची प्रकाशोत्सव आम्ही साजरा करणार आहोत. जोगेश्वरी पूर्व येथे हा कार्यक्रम असणार आहे. मुंबईकरांसाठी भाजप आणि मुंबईकरांच्या आनंदात भाजप हे चित्र निर्माण झालंय जे दुसऱ्यावर जळत राहतात ते दुसऱ्यांच्या आयुष्यात आंनद कसे देतील असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी म्हणजे हा एक उठाव

सध्या पेंग्विन सेनेला कावीळ झालीय दिसेल ते त्यांना पिवळचं दिसतं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीबाबत विचारल्यास ते म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या कुटूंबीयांची संपत्तीच्या चौकशीची मागणी करण्यात आलीय ती एका मराठी माणसाने केलीय हा एक उठाव आहे. जवळच्याच व्यक्तीनं ही मागणी केलीय वाद विवाद आणि अशांतता करण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जात आहे. ठाकरे गटातील नव्याने आलेल्या बांडगुळांकडून हे नवीन वाद निर्माण केले जात आहेत. राज्यातील मूळ शिवसैनिक हा एकनाथ शिंदेंबरोबर आहे. यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची होणार असल्याचे ते म्हणाले.

हे ही वाचा : ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढणार? भास्कर जाधवांसह या नेत्यांवर अटकेची टांगती तलवार

मुंबईकरांशी भाजपची नाळ

मुंबईकरांशी भाजपची नाळ जोडली गेलेली आहे. यामुळे आम्ही दिवाळीत मराठी माणसांना स्थान देत मोठे कार्यक्रम ठेवले आहेत. याउलट ठाकरे गटाची सेना ही पेग, पेंग्विन आणि पब यामध्येच तिथले आमदार गुंतले आहेत. मुंबईतील मराठी माणसाला मोठं करण्याचं काम भाजप करत असल्याचे ते म्हणाले. तसेच ऋतुजा लटके ह्या जिंकल्या पाहिजेत म्हणून आम्ही माघार घेतली असल्याचे त्या म्हणाल्या.

First published:
top videos

    Tags: Aaditya Thackeray, Ashish shelar, BJP, Shiv sena, Uddhav Thackeray (Politician)