मुंबई, 03 ऑक्टोबर : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे मुंबईतील अंधेरी पूर्व भागामध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाण कुणाकडे जाणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षचिन्हाबाबत निवडणूक पोटनिवडणुकीच्या आधी निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेना की शिंदे गटाकडे पक्षचिन्ह जाणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिवसेना आणि शिंदे गटात लढत होणार आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने आले आहे. पण अजूनही शिंदे गटाला पक्षाचे चिन्ह न मिळाल्यामुळे सस्पेन्स निर्माण झाला आहे. पोटनिवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोग शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंधेरी निवडणुकीत उमेदवारांना चिन्ह द्यावं लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याबाबत निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलावला आहे. त्यामुळे शिंदे गट जर वेगळ्या चिन्हासह निवडणूक लढणार असेल तर त्यांना पक्षचिन्ह द्यावे लागणार आहे.
रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अंधेरी पूर्वची ही पोटनिवडणूक कधी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे, कारण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचा हा पहिलाच सामना आहे. तसंच या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार, हेदेखील महत्त्वाचं ठरणार आहे.
(खडसेंची होणार घरवापसी? फडणवीसांच्या कानात काही तरी म्हणाले, महाजनांचा मोठा गौप्यस्फोट)
शिवसेना नेमकी कुणाची यावरून सध्या सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होईपर्यंत जर या दोन्ही प्रकरणांचा निकाल लागला नाही, तर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं, अशा परिस्थितीमध्ये शिंदे आणि ठाकरे यांना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते.
(राहुल गांधींचा 'शरद पवार पॅटर्न'; धो-धो पावसात दिलं भाषण, 'भारत जोडो' यात्रेतील Video Viral)
जून महिन्यामध्ये विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांबरोबर बंड केलं. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार गेले, याशिवाय त्यांना 10 अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिला. शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने पाठिंबा दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.