जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खडसेंची होणार घरवापसी? फडणवीसांच्या कानात काही तरी म्हणाले, महाजनांचा मोठा गौप्यस्फोट

खडसेंची होणार घरवापसी? फडणवीसांच्या कानात काही तरी म्हणाले, महाजनांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. आता

राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. आता

राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. आता

  • -MIN READ Jalgaon,Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 03 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये पुन्हा एकदा परतण्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कानात एकदा भेटून मिटवून टाकू, असं म्हटल्याचा गौप्यस्फोट भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. आता नाशिकमध्ये एकनाथ खडसे, भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीबाबत गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंबाबत एक गौप्यस्फोट केला. नाशिकमधील एका कार्यक्रमात एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस आणि मला भेटले. यावेळी  फडणवीसांच्या कानात खडसेंनी एकदा भेटून मिटवून टाकू असं सांगितल्याचा गौप्यस्फोट महाजनांनी केला आहे. महाजनांच्या गौप्यस्फोटानंतर खडसेंना भेटून नेमकं काय मिटवायचंय? खडसे भाजपमध्ये जाण्याच्या विचारात आहेत का? अशा अनेक चर्चांना उधाण आलंय. (…म्हणून हॅलो नाही वंदे मातरम् म्हणायचं, फडणवीसांनी सांगितलं कारण) मात्र,  एकनाथ खडसेंना नेमके काय मिटवायचे आहे हे सांगणे मात्र गिरीश महाजन यांनी टाळले आहे. काही दिवसांपूर्वीच  भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत एकनाथ खडसे हे दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीला गेले होते. पण, अमित शहा यांचं व्यस्त शेड्युल असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. मात्र एकनाथ खडसे यांची फोनवरुन अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे अशी माहिती खुद्द भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली होती. (राहुल गांधींचा ‘शरद पवार पॅटर्न’; धो-धो पावसात दिलं भाषण, ‘भारत जोडो’ यात्रेतील Video Viral) विशेष म्हणजे, भोसरी भूखंड प्रखरणामुळे एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय अडचणीत सापडले आहे. शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा एकदा खडसेंच्या भूखंड प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या भेटीमुळे घरवापसीची चर्चा रंगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात