मुंबई, 24 नोव्हेंबर : देशात नवनवीन उद्योग-व्यवसाय सुरू होत आहेत. नोकरी करण्यापेक्षा अनेक तरुण-तरुणी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याला प्राधान्य देत आहेत. तरुणाई उद्योग व्यवसायात रस घेताना दिसत आहे. मुंबईत राहणारी आकांशा गूराफे या तरुणीने देखील चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. मुंबईतील भायखळा बकरी अड्डा येथे राहणारी आकांशा गूराफे 24 वर्षांची असून तिने मार्केटिंग मध्ये असलेली 35 हजारांची नोकरी सोडून स्वतःच वेगळं काही तरी सुरू करायचं म्हणून दादर मध्ये व्रॅप हाऊस सुरू केलं आहे. आकांशा गूराफे हिने खालसा या महाविद्यालयातून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. मात्र, शिक्षण पूर्ण करून नोकरी करत असताना तिथे काम करण्याची इच्छा होत नव्हती. स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार डोक्यात होता. तिला व्रॅप हाऊसची संकल्पना सुचली. धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना पौष्टीक आहार मिळत नाही. त्यामुळे असं काही तरी लोकांना दिलं पाहिजे जे त्यांच्या सोयीचं असेल. म्हणून ’ इजी टू व्रॅप इजी टू इट’ ही संकल्पना सुचली आणि व्रॅप हाऊसची सुरुवात झाली.
Video : नोकरी सोडून सुरू केलं चॅट सेंटर, बेरोजगार तरुणांचाही बनला आधार
लॉकडाऊन मध्ये ही संकल्पना डोक्यात आली होती. मात्र, जेव्हा मी हे सुरू केलं अक्षरशः माझ्या मित्रांना सुद्धा विश्र्वास बसत नव्हता. आज व्रॅप हाऊस सुरू होऊन सहा महिन्यांच्या वर कालावधी पूर्ण झाला आहे आणि यामध्ये माझ्यासोबत एका तरुण व्यक्तीला लाजवेल अशी 73 वर्षांची माझी आजी मला मदत करते. व्रॅप हाऊस सुरू करण्याच्या आधी पासून आजी मला मदत करते. आज किचन पासून ते ग्राहकांशी बोलण्यापर्यंत आजी मदत करते आहे, असं आकांशा गूराफे सांगते. व्रॅप हाऊस म्हणजे काय? वेळ न घालवता लवकरात लवकर फूड हे व्रॅप करून म्हणजेच गुंडाळून किंवा पॅक करून दिलं जातं. जे ‘इजी टू व्रॅप इजी टू इट’ या संकल्पनेवर आधारित आहे.
पोहे आवडणाऱ्यांसाठी एकाच ठिकाणी आहेत भरपूर पर्याय, प्रत्येकाची चव भारी! Video
व्रॅप हाऊस मध्ये मिळतात हे पदार्थ आकांशा गूराफे हिने सुरु केलेल्या व्रॅप हाऊस मध्ये व्हेज खिमा व्रॅप, बटर पनीर व्रॅप, व्हेज मेक्सिकन व्रॅप, चिकन खिमा व्रॅप, सिझलिंग चिकन व्रॅप, पेरी फ्राइज्, इत्यादी पदार्थ मिळतात.
गुगल मॅपवरून साभार
कुठे आहे व्रॅप हाऊस? हे व्रॅप हाऊस दादर पुर्व येथील शिवनेरी बस स्थानकाच्या अगदी जवळ आहे.

)







