मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : नोकरी सोडून सुरू केलं चॅट सेंटर, बेरोजगार तरुणांचाही बनला आधार

Video : नोकरी सोडून सुरू केलं चॅट सेंटर, बेरोजगार तरुणांचाही बनला आधार

अल्पावधीत चॅट सेंटरला उत्तम प्रतिसाद मिळाला असून चॅट सेंटरवर चार युवकांना रोजगार सुद्धा मिळाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 24 नोव्हेंबर : अमरावती शहरातील एका उच्च शिक्षित तरुणाने नोकरी सोडून पाणीपुरी चाट सेंटर उघडले. प्रचंड मेहनतीनं उत्तम चवीची पाणीपुरी बनवली. अल्पावधीत चॅट सेंटरला उत्तम प्रतिसाद मिळाला असून चॅट सेंटरवर चार युवकांना रोजगार सुद्धा मिळाला आहे. येथील पाणीपुरीची चव संपूर्ण शहरातच नव्हे तर आजूबाजूच्या खेड्यापाड्यात सुद्धा प्रसिद्ध झाली आहे. चॅट प्रेमी येथे आवडीने पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. 

गौरव कपीले असं या तरुणांच नाव असून नागपूरच्या पंचवतीटत मान्सून चॅट सेंटर त्याने सुरू केले आहे. कॉलेज सुरू असताना गौरवने प्रायव्हेट जॉब केला. परिस्थिती गरीब असल्यामुळे जॉबवर घर खर्च भागत नसे, त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. 2015 साली अमरावती येथील पंचवटीला पाणीपुरीचा स्टॉल सुरू केला. स्टॉल सुरू असताना समाजातील बरेच लोकांनी नकारात्मक बाजू ठेवली. हे काय करतोय, नोकरीच कर तुला व्यवसाय जमणार नाही वगैरे... पण जिद्द आणि चिकाटीने वर्षातून एकही सुट्टी न घेता सुरुवातीला 3-4 वर्षे सतत मेहनत घेतली. सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत सगळी कामे तो करायचा. सगळे मटेरियल नैसर्गिक पद्धतीने बनवत असल्याने लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला. परिवाराचा सपोर्ट असल्यामुळे त्याने कुठेच माघार घेतली नाही. आता 3-4 युवकांना रोजगार सुद्धा दिला आहे.

पाणीपुरीसह करिअर मार्गदर्शन

चाट सेंटरवर येणाऱ्या शालेय विद्यार्थी तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इथे फक्त पाणीपुरी किंवा शेव पुरीच मिळत नाही, तर आपल्या करिअर संदर्भात योग्य मार्गदर्शन तसेच एखाद्या उद्योग संदर्भात योग्य मार्गदर्शन सुद्धा गौरव कडून मिळतं. त्यामुळे इथे येणारे जे तरुण आहेत ते फक्त शेवपुरी किंवा पाणीपुरी खायच्या दृष्टीने नाही, तर ते आपल्या करिअरसाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळतं, या दृष्टीने येतात. युवकांमध्ये या चाट सेंटरबद्दल आकर्षण आहे, हे विशेष. त्याचबरोबर इथली शेवपुरी ही जिभेला नाही तर, मनाला मोहित करणारी आहे, नियमित येणारे ग्राहक पंचवटी आल्यानंतर या शेवपुरी किंवा दहीपुरी आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाही. इथली स्वच्छता, त्याचबरोबर इथे काम करणाऱ्या रोजगारांची ग्राहकांसोबत असलेली वर्तणूक सुद्धा कौतुकास्पद आहे. 

तरुणानं सुरू केलं गावाच्या नावानं हॉटेल, झणझणीत मिसळीसाठी होतीय गर्दी, Video

शिक्षणासह रोजगार

"आमचा दादा आम्हाला रोजगार म्हणून कधीच वागणूक देत नाही, एक छोटा भाऊ म्हणून आम्हाला वागवितो. त्याचबरोबर आम्हाला म्हणतो की, परिस्थितीनुसार प्रत्येकाला रोजगार शोधावा लागतो, पण त्यामुळे आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याचसोबत शिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने करा. आणि आपले करिअर बनविण्यासाठी जोमाने प्रयत्न करा." अशी प्रतिक्रिया या चाट सेंटर वर काम करीत असलेल्या रोजगाराची ऐकल्यानंतर नक्कीच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, कारण सध्याच्या जगात मजूर वर्गासोबत होणारी पिळवणूक आणि एकीकडे अशी वागणूक, निश्चितच समाजभान जोपासणारी आहे.

First published:

Tags: Amravati, Local18, Local18 food