जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पोहे आवडणाऱ्यांसाठी एकाच ठिकाणी आहेत भरपूर पर्याय, प्रत्येकाची चव भारी! Video

पोहे आवडणाऱ्यांसाठी एकाच ठिकाणी आहेत भरपूर पर्याय, प्रत्येकाची चव भारी! Video

पोहे आवडणाऱ्यांसाठी एकाच ठिकाणी आहेत भरपूर पर्याय, प्रत्येकाची चव भारी! Video

या स्पेशल हॉटेलमध्ये पोह्यांचे 15 ते 20 प्रकार मिळतात. प्रत्येक प्रकाराची चव आणि त्याची पद्धत वेगळी आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 14 नोव्हेंबर : सकाळ सकाळी गरमागरम वाफळलेले पोहे असले म्हणजे नाश्ता आपला भारीच झाला समजायचं. प्रत्येक शहरात पोहे बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते कुठे तर्री पोहे, कुठे कांदे पोहे तर कुठे दडपे पोहे असे वेगवेगळे प्रकार खाल्ले जातात. मोठमोठ्या शहरामध्ये विविध भागातून लोकं येऊन राहतात मग त्यांना आपापल्या घरचे पोहे तर हवेचं असतात म्हणून आम्ही पोहेकर या दुकानात फक्त पोहे पण वेगवेगळ्या प्रकारचे पोहे मिळतात. ‘आम्ही पोहेकर’ हे ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेलं दुकान आहे. येथे घरचे कांदे पोहे ते इंदोरी पोह्यापर्यंत अनेक प्रकारचे पोहे खायला मिळतात. कोणते प्रकार मिळतात? आम्ही पोहेकर येथे 15-20 प्रकारचे पोहे मिळतात. घरचे पोहे, इंदोरी पोहे, कोकणी पोहे, दडपे पोहे, पोहे दही तडका, पोहे दही, नागपुरी तर्री पोहे,भेळ पोहे,पोहे चीज,पोहे मिसळ, पोहे दही मिसळ,पोहे न्यूट्री प्लेट, पोहे नगेट्स, पोहे बॉल, पोहे चीज बॉल, पोहे बर्गर,चहा पोहे, या वेगवेगळ्या प्रकारचे पोहे इथं मिळतात. प्रत्येक पोह्याची बनवण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. कधी असते गर्दी? अनेक जण रोज सकाळी घराबाहेर पडताच नाश्ता करतात आणि पुढच्या कामाला निघतात. त्यामुळे इथं सकाळी गर्दी असते. त्याचबरोबर विकएंडच्या दिवशी स्पेशल नाश्ता करण्यासाठी देखील अनेकांची ‘आम्ही पोहेकर’ला पसंती असते. त्यामुळे इथं विकएंडला जास्त गर्दी होते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    गुगल मॅपवरून साभार या पोह्यांची चवच न्यारी मुंबईत तर्री पोहे खुप कमी ठिकाणी मिळतात त्यामुळे इथले तर्री पोहे वेगळेच आहेत. पोह्यांची भेळ सुद्धा बनवली जाते कुरमुऱ्यांऐवजी यात पोहे घातले जातात. इंदोरी पोह्यामध्ये फरसाण, डाळिंब याचं कॉम्बिनेशन असतं. चीज बॉल तर अप्रतिम डिश आहे. चीज मिक्स असलेला पोह्यांचा गोळा फ्राय केला जातो. सुदाम्याचे नऊ प्रकारचे पोहे, प्रत्येकाची चव आहे भारी! पाहा Video पुण्यात चार तरुणांनी मिळून ‘आम्ही पोहेकर’ सुरु केलं होतं मुंबईत यापूर्वी अशी संकल्पना नसल्यामुळे मी आणि माझ्या भावाने त्याची फ्रेंचायसी मुंबईत सुरु करण्याचं ठरवलं.आमच्याकडे पोहे अगदी स्वच्छ पद्धतीने बनवले जातात तसेच लोकांना सुद्धा आवडतात प्रत्येकाच्या तोंडाची चव वेगळी असते त्यामुळे वेगवेगळे पोहे खाणारे लोकं इथे भेट देतात. असं शाखा मालक प्रथमेश देशपांडे यांनी सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात