जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ओला दुष्काळ जाहीर करा! या दोघांना प्रत्येकवेळी दिल्लीत जाऊन.. अजित पवार सरकारवर भडकले, म्हणाले..

ओला दुष्काळ जाहीर करा! या दोघांना प्रत्येकवेळी दिल्लीत जाऊन.. अजित पवार सरकारवर भडकले, म्हणाले..

ओला दुष्काळ जाहीर करा! या दोघांना प्रत्येकवेळी दिल्लीत जाऊन.. अजित पवार सरकारवर भडकले, म्हणाले..

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जुलै : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार स्थापन झालं आहे. सरकार स्थापन झाल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दुसरीकडे सरकार सत्तेत आल्यानंतर मागच्या सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थिगित देण्याचा सपाटाच शिंदे सरकारने लावलेला दिसतो. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. यावेळी मागच्या सरकारच्या कामांना स्थिगिती देण्यावरुन पवारांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. काय म्हणाले अजित पवार? अधिवेशन तारखा सातत्यानं पुढे जात आहे. हे सरकार जर बहुमतात आहे तर मग अधिवेशन का घेत नाही. विधीमंडळात आमदारांना आपले प्रश्न मांडता येतात. मात्र, जाणीवपूर्वक अजूनही मंत्रिमंडळ विस्तार आणि अधिवेशन घेतलं जात नाही. मागील काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा येथे मुसळधार पाऊस पडत आहे. याठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु, गेले काही दिवस केवळ दोघांचं मंत्रिमंडळ आहे. हा राज्याचा अपमान आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा आत्महत्या होत आहे आपल्याकडे धरणाची पाणी पातळी चांगली आहे. अशी परिस्थिती जुलै मध्ये कधी पहिला मिळतं नाही. मी देखील काही भागात पाहणी केली आहे आणि आणखी काही भागात पाहणी करण्यासाठी मी जाणार आहे. तात्काळ अधिवेशन बोलवलं पाहिजे. तिरुपती देवस्थान बाबत एक बातमी समोर येते आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे याबाबात बोलणं झालं आहे. ते लवकरच याबाबात बोलतील. कदाचित आजचं ते बोलतील. भाविकांच्या भावना भडकावल्या जातं आहेत. आपल्या राज्याचा मुख्यमंत्री यांनी तात्काळ त्या राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधावा आणि नेमकं खरं काय आहे ते समोर आणावं.

पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये युतीची चर्चा झाली होती का? दीपक केसरकरांचा ‘मातोश्री’ला थेट सवाल

एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत काम केलं तेच आता कामांना स्थगिती देतं आहेत. ते दोघे काय सत्तेचा ताम्र पट घेउन आले आहेत का? संभांजी महाराजांसाठी वढू साठी निधी दीला होता तो देखील थांबवला आहे. सहकारातील निवडणुका का थांबवल्या का कळलं नाही. ज्या दिवशी मतदान त्याचं दिवशी ती पुढे ढकलण्याचे आदेश दिले. हे सरकार काय ताम्रपठ घेउन आले काय. 2021 पर्यंतचे काम बंद करने बरोबर नाही. हे सरकार पण जाईल. थोडे दिवस जाऊद्या मग सभागृहात सांगतो, कुठं दगड ठेवला अन् कुठे धोंडा ठेवला. ताबोडतोब ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. त्यासाठी ताबोडतोब अधिवेशन बोलावलं पाहिजे. या दोघांच्या हातात काही जास्त दिसत नाही. यांना दिल्लीत जावं लागतंय. तिकडे हिरवा झेंडा दाखवला तरच काम होतं. आमदार बबन शिंदे आणि राजन पाटील यांच्या बाबती ती बातमी चुकीची आहे. माझं बबन शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात