जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये युतीची चर्चा झाली होती का? दीपक केसरकरांचा 'मातोश्री'ला थेट सवाल

पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये युतीची चर्चा झाली होती का? दीपक केसरकरांचा 'मातोश्री'ला थेट सवाल

 
मी तीन प्रश्न विचारले होते,त्यापैकी एकाचेही उत्तर दिलेले नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला नाही.

मी तीन प्रश्न विचारले होते,त्यापैकी एकाचेही उत्तर दिलेले नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला नाही.

मी तीन प्रश्न विचारले होते,त्यापैकी एकाचेही उत्तर दिलेले नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जुलै : शिवसेनेमध्ये बंडखोरी पुकारल्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, अजूनही शिवसेना आणि शिंदे गटात वाद सुरूच आहे. आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणार असे आश्वासन दिले होते का? असा प्रश्नच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. तसंच, पंतप्रधान मोदींसोबत युतीची चर्चा झाली होती का? असा सवालही केसरकरांनी विचारला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा टिझर आल्यानंतर शिंदे गटात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आज दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न थेट शिवसेनेला विचारले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणार असे आश्वासन दिले होते का?  एकनाथ शिंदे यांनी मला मुख्यमंत्रिपद नको हे पद तुमच्याकडेच राहू द्या..फक्त राष्ट्रवादी-कॉंग्रेसबरोबर युती करु नका असे म्हणाले होते का? आणि तिसरा प्रश्न असा की, राहुल शेवाळे म्हणाले की, पक्षप्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये युतीबद्दल चर्चा होती.  पण उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले आणि तेव्हापासूनच चर्चा ही फिस्कटली हे खरं आहे का? असे तीन प्रश्न केसरकर यांनी पुन्हा उपस्थितीत केले आहे. मी तीन प्रश्न विचारले होते,त्यापैकी एकाचेही उत्तर दिलेले नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला नाही. केंद्राशी चांगले संबंध राहिले असते तर विकासाला चालना मिळाली असती.पण रोज सकाळी ९ वाजता बोलून केंद्रावर टिका केली गेली, अशी टोलाही केसरकरांनी राऊतांना लगावला. खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार कुणी दिला.आजारी असताना कटकारस्थान झाले नाही. आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली म्हणजे कटकारस्थान नाही. कालपर्यंत न फिरणारे आता फिरू लागलेत. सातव्या मजल्यावरील ऑफिसात कितीवेळा गेलात व काय कामं केले, असा टोलाही केसरकरांनी लगावला. ‘अडीच वर्षे राजकारण चालले. जे आता थांबले पाहिजे. घरावर मोर्चे काढणे थांबवा. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. उद्धव ठाकरेंना आजूबाजूचे लोक भडकवतात. त्यांना बाजूला करण्याची गरज आहे, आमदाराची गाढवावरून धिंड काढण्याची भाषा करतात. आम्हालाही त्याच भाषेत बोलता येते.पण आम्ही आदर करतो, असा इशाराही केसरकरांनी दिला. आमच्या बाजूने जे आलेत त्यांना तुम्ही काढता. लोकशाही आहे की नाही. बाळासाहेब ठाकरे हे एका कुटुंबाचे नाहीत तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. एकट्याने लढून दाखवा आणि मग किती जागा येतात ते पहा. मागील वेळी भाजप-सेना युतीला मते दिली होती, असंही केसरकरांनी बजावलं. ‘आम्हालाही शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील माहिती नव्हते. त्याच प्रकारे भाजप नेत्यांनाही हे अपेक्षित नव्हते. राजकारण बाजूला ठेवा,आम्हाला सामान्य लोकांची कामे करू द्या. उद्धव ठाकरेंची मुलाखत जरूर पाहणार आहे. त्यातील केवळ मुद्यांवर बोलेन पण उद्धव ठाकरेंवर टीका करणार नाही, असंही केसरकरांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात