मुंबई, 28 फेब्रुवारी: शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागानं छापा टाकला होता. आता तब्बल 100 तासानंतर चौकशी अखेर संपली आहे. गेल्या चार दिवसापासून यशवंत जाधव यांच्या घरी झडती सुरू होती. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्यांनी नवं ट्विट केलं आहे. तब्बल चार दिवसांनंतर ही चौकशी अखेर संपली आहे. शुक्रवार सकाळपासून इन्कम टॅक्स विभागाचे (Income Tax Raid) अधिकारी जाधव यांच्या घरी तळ ठोकून होते. तब्बल 100 तासानंतर आयकर विभागाचे अधिकारी सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास परतले. या चौकशी दरम्यान मोठ्या प्रमाणात कागदपत्र, डिजिटल साधने (स्कॅनर, लॅपटॉप, हार्ड डिस्क) ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळतेय. आज सकळी 10 च्या दरम्यान हे सर्व आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरातून बाहेर पडले आहेत. आतापर्यंत 33 ठिकाणच्या झाडाझडतीत एकूण 2 कोटींच्या रकमेसह महत्त्वपूर्ण कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. या छापेमारीच्या या पार्श्वभूमीवर यशवंत जाधव यांच्या घराबाहेर पोलिसंचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र या चार दिवसांच्या चौकशीत अधिकाऱ्यांच्या हाती नेमकं काय लागलं ते अद्याप गुलदस्त्यात आहे. किरीट सोमय्या यांचं ट्विट शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात आम्ही 18 ऑगस्ट 2021 रोजी आयकर विभाग आणि ईडी (ED) कडे तक्रार दाखल केली होती, असं सोमय्या यांनी ट्विट केलं आहे.
Shivsena Yashwant Jadhav Fàmily Fraud, We had filed Complaint with Income Tax, ED... on 18 August 2021.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 28, 2022
शिवसेना यशवंत जाधव घोटाळा. आम्ही 18 ऑगस्ट 2021 रोजी आयकर, ED कडे तक्रार दाखल केली होती. @BJP4India @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/Bm12iogh21
मुंबईतील माझगाव भागात असलेल्या घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु होती. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार आहेत. शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ जवानांसह शुक्रवारी सकाळीच दाखल झाले होते. त्यानंतर त्यांची चौकशी सुरु होती. यादरम्यान मुंबई महापालिकेच्या काही कंत्राटदारांवरही आयकर खात्यानं छापा टाकून कारवाई केली.