नालासोपारा, 03 नोव्हेंबर: ठाण्यातील नालासोपारा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपारा परिसरात माझी नाही तर कुणाचीच नाही अस म्हणत एका विवाहित महिलेच्या अंगावर अॅसीड फेकल्याची घटना समोर आली आहे. प्रियकराने एका विवाहीत तरुणीवर अॅसीड हल्ला करून दिला विद्रुप करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रियकर कामरान अन्सारी याला पेल्हार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्व वाकणपाडा येथे राहणारी विवाहित महिला (20) हीचा घाटकोपर येथे राहणाऱ्या तौफीक इद्रासी बरोबर विवाह झाला होता. दरम्यान त्या महिलेला ४ वर्षाची मुलगी आहे. पण तौफिक तिला सतत मारहाण करत असल्याने तीने त्याला सोडून दिले होते.
हे ही वाचा : कोल्हापुरात भर चौकात “दम मारो दम”; कुणालाही न जुमानता तरुणाचा माज, LIVE VIDEO
यानंतर याच परिसरात राहणाऱ्या कामरान अन्सारी याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये ती महिला राहत होती. पण कामरानने सुद्धा लग्नाला नकार दिल्याने तीने त्याला सुद्धा सोडून दिले. त्यानंतर ती नालासोपारा येथील कमाल खान याच्यासोबत राहत होती.
याची खबर पहिला पती तौफिक आणि प्रियकर कामरान याला समजताच दोघांनी तिच्यासोबत भांडण केले. मात्र महिलेने दोघांनाही नकार दिला आणि कमाल सोबतच राहणार असे ठणकावून सांगितल्याने संतप्त झालेल्या कामरानने तिच्यावर रात्री दोनच्या सुमारास कमाल आणि पिडीत महिला झोपले असताना खिडकीची काच उघडून दोघांच्या अंगावर अॅसिड फेकून पळून गेला. यात पिडीत महिला जखमी झाली असून तिसरा प्रियकर कमालही जखमी झाला आहे. दोघांवरही सध्या उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा : अपत्य होत नसल्याने सतत भांडायचा पती; महिलेनं 20 वर्षाच्या संसाराचा केला भयानक शेवट
दरम्यान पेल्हार पोलिसांनी कामरान अन्सारी याला ताब्यात घेवून अटक केली असून आज त्याला वसई न्यायलयात हजर करण्यात येणार आहे. असे पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी सांगितले.