जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापुरात भर चौकात "दम मारो दम"; कुणालाही न जुमानता तरुणाचा माज, LIVE VIDEO

कोल्हापुरात भर चौकात "दम मारो दम"; कुणालाही न जुमानता तरुणाचा माज, LIVE VIDEO

कोल्हापुरात भर चौकात "दम मारो दम"; कुणालाही न जुमानता तरुणाचा माज, LIVE VIDEO

सदरचा तरुण हा हुक्का आणि बेटिंगचा व्यवसाय करतो.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 1 नोव्हेंबर : पुरोगामी कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात एका तरुणाचा माज दिसला आहे. भर चौकात हा तरुण दम मारो दम करत हुक्का घेताना दिसला. यांसंबधीचा व्हिडिओ समोर आला आहे. हा तरुण स्वत: बेटिंग, हुक्का व्यवसायाशी संबंधित आहे. भर चौकात प्रत्येक 15 दिवसाला दम मारो दम चा प्रकार होत असतो, अशी माहिती समोर आली आहे. तर काही चौकात मध्यरात्री आतषबाजीही करण्यात आली. दम मारो दर करत हुक्का घेतल्याचा हा प्रकार धैर्यप्रसाद चौकात घडला. तर तावडे हॉटेल परिसरात आतषबाजी करण्यात आली. म्हणे पोलीस आपल्या खिशातच - सदरचा तरुण हा हुक्का आणि बेटिंगचा व्यवसाय करतो. त्याचे ब्रँडिंग करण्याचा हा त्याचा प्रयत्न आहे. गांधीनगरमध्ये तो राहतो. आलिशान गाड्यांद्वारे तो इम्प्रेशन टाकत असतो. पोलीस आपल्या खिशात असल्याचा त्याचा अविर्भाव असतो. बाकी

जाहिरात

हेही वाचा -  मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून चाकूने भोसकले, हत्येचा LIVE VIDEO कोल्हापुरात वीज पुरवठा खंडीत होताच 20 वर्षीय मुलाचा खून -  कोल्हापूर जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंडाचा पाठलाग करून खून केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका घटनेने खळबळ माजली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शहर कोल्हापूर शहरानंतर सर्वात मोठे शहर मानले जाते. दरम्यान हे शहर वस्त्रोद्योगात अग्रेसर असल्याने या शहरात पैशाची मोठी उलाढाल होत असते. यामुळे शहरात गुंड आणि सावकारकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान 31 ऑक्टोबरला रात्री 20 वर्षीय पानटपरी वाल्याचा खून झाल्याने खळबळ माजली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: kolhapur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात