रवी सपाटे, गोंदिया 03 नोव्हेंबर : आत्महत्येच्या कित्येक घटना दररोज समोर येत असतात. मात्र, यातील अनेक घटनांमध्ये आत्महत्येची कारणं ही हादरवून सोडणारी असतात. अतिशय क्षुल्लक कारणावरुन अनेकदा लोक टोकाचं पाऊल उचलतात. तर अनेकदा हे पाऊल उचलण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जातं. गोंदियामधून नुकतंच आत्महत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला 10 वर्ष होऊनही मूल झालं नाही; साताऱ्यातील दाम्प्त्याने उचललं धक्कादायक पाऊल या घटनेत 41 वर्षीय विवाहितेनं विहिरित उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या दवनीवाडा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या खडबंदा गावात घडली आहे. आशाबाई सुनील कापसेकर वय 41 वर्ष असं महिलेचं नाव आहे. त्या खडबंदा येथील रहिवासी होत्या. लग्नाला 20 वर्ष झालेली मात्र तरी मृतक महिलेला अपत्य नसल्याने मृतक महिलेचा तिच्या पतिसोबात सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रात्रीसुद्धा याच कारणाने दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की आशाबाई यांनी संतापाच्या भरात घरालगत असलेल्या शेतशिवारातील विहिरित उडी घेऊन आत्महत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला दिसला. यानंतर संबंधित घटना उघड झाली आहे. याप्रकरणी दवनिवाडा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. 10 वर्षाच्या मुलाने केली आई आणि तिच्या प्रियकराची पोलखोल, पोलिसांना दिली पित्याच्या हत्येची माहिती साताऱ्यातील दाम्प्त्याची आत्महत्या - साताऱ्यातूनही महिनाभरापूर्वी अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात आई-बाप न होता आल्याच्या दुःखात एका दाम्प्त्याने थेट टोकाचं पाऊल उचललं. दाम्प्त्याने मूल होत नसल्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील वाई तालुक्यातील कणूर गावात घडली. या दोघांचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, 10 वर्षांच्या त्यांच्या संसाराचा अतिशय हृदयद्रावक अंत झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.