मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंबाबत वापरले अपशब्द

अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंबाबत वापरले अपशब्द

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या' अशी टीकाच सत्तार यांनी केली.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या' अशी टीकाच सत्तार यांनी केली.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या' अशी टीकाच सत्तार यांनी केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

नाशिक, 07 नोव्हेंबर : बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या' अशी टीकाच सत्तार यांनी केली. सत्तार यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या सिल्लोडमध्ये होणाऱ्या जाहीर सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलेल्या अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद आणि सिल्लोड दौऱ्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलत असताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देताना अपशब्द वापरले.

" isDesktop="true" id="783061" >

तसंच, 'सगळं वाहून गेल्यानंतर दौरे करताय जेव्हा सत्ता होती तेव्हा कुठे होते. इतकच नाही तर आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी साफसफाई करण्यापासून खुर्च्याही आम्ही दिल्या आता माणसंही आम्ही द्यायचे का असा खोचक टोलाही सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

(नवनीत राणांवर कारवाई का नाही? तुम्ही मॅनेज झाले का? कोर्टाने पोलिसांना झापलं)

दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात येणार आहे.

(राहुल गांधींना महाराष्ट्राच्या खास खाद्यपदार्थांची मेजवानी, या पदार्थांचा समावेश)

तर, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँगेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा अब्दुल सत्तार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा वैशाली नागवडे यांनी दिला आहे. वैशाली नागवडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा आहेत.

काय म्हणाले सत्तार?

'महाराष्ट्रामध्ये कोणतीही खळबळ उडाली नाही. मी माझ्याा बोलण्यावर ठाम आहे. जे आम्हाला खोके घेतले म्हणून बदनाम करत आहे, ते XXXचोट आहे. ते मग कुणीही असेल. खोके घेतले अशा शब्दांत जर कुणी टीका करत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. मी जे बोलतोय खरं आहे. तुम्ही एका व्यक्तीचे नाव कशाला घेता. मी सर्वांसाठी बोललो. आता सर्वांसाठी बोललो. तुम्ही एका महिलाबद्दल बोलताय, असं न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीने सांगितलं, तरीही सत्तार म्हणाले की, मी सर्वांसाठी बोललोय. अजून कुणीही बोलेल, ते ज्या भाषेत बोलले, त्याला उत्तर देईन.'

First published:
top videos