मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai Santacruze Murder Case : नवऱ्याचा घात करण्यापूर्वी सासूलाही हळूहळू मारलं, मुंबईत slow poisoning चा धक्कादायक प्रकार उघड

Mumbai Santacruze Murder Case : नवऱ्याचा घात करण्यापूर्वी सासूलाही हळूहळू मारलं, मुंबईत slow poisoning चा धक्कादायक प्रकार उघड

शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि तपास सुरू केला. दरम्यान यातून आता नवीन एक माहिती समोर आली आहे

शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि तपास सुरू केला. दरम्यान यातून आता नवीन एक माहिती समोर आली आहे

शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि तपास सुरू केला. दरम्यान यातून आता नवीन एक माहिती समोर आली आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 06 डिसेंबर : मागच्या काही दिवसांपूर्वी प्रियकराच्या मदतीने पतीचा हत्या केल्याची घटना मुंबईत घडली होती. दरम्यान या घटनेतून धक्कादायक  माहितीसमोर येत आहे. आरोपी प्रियकर हा मृत व्यक्तीचा जुना मित्र असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हत्येचा संशय येऊ नये यासाठी आरोपींनी कट रचला होता.

मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि तपास सुरू केला. दरम्यान यातून आता नवीन एक माहिती समोर आली आहे. या दोघांनी मिळून सासूचाही खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. सासूलाही त्यांनी अशाची पद्धतीने मारल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : माता न तू वैरिणी! पोटच्या 15 वर्षीय मुलाची हत्या; मग घरातच खड्डा खोदून केलं थरकाप उडवणारं काम

कमलकांत शाह असे मृताचे नाव असून त्यांचा कवितासोबत 2002 मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मृत कमलकांत शाह आणि आरोपी हितेश जैन यांची जुनी मैत्री होती. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या मैत्री झाली होती. त्यातच मृत कमलकांत यांची पत्नी कविता उर्फ काजल आणि हितेश जैन यांच्यात विवाहबाह्य प्रेम संबंध तयार झाले होते.

जवळपास 10 वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर कमलकांत यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला असावा असा पोलिसांचा संशय आहे. प्राथमिक तपासातून पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान कमलकांत शाह हे मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहतात. त्यांनी पतीसोबत सासूचीही हत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे. महिलेने आणि तिच्या प्रियकराने आपल्या सासूची अशीच हत्या केल्याची कबुली दिली आहे. कमलकांतच्या आईचीही या दोघांनीच हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, दोघांनी या मृत्यूमध्ये आपला सहभाग असल्याचा इन्कार केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत कमलकांत शाह यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कमलकांत यांना पोटात दुखत असल्याची तक्रार होती. दरम्यान त्यांना उपचारावेळी मृत्यू झाला.

हे ही वाचा : दुकान बंद करून घरी निघाला पण पोहचलाच नाही; सराफा व्यापाऱ्यासोबत घडले भयंकर कृत्य

यावेळी कमलकांत शाह यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. हा अहवाल पाहिल्यानंतर पोलीसांनाही याबाबत थोडा संशय आला. विषबाधेतून त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तसाच मृत्यू त्यांच्या सासूचाही मृत्यू झाला आहे. या दोन्ही मृत्यूंमध्ये साम्य असल्याने आईच्या मृत्यूचा तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शवविच्छेदन अहवालात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कलम 302, 328, 120 (बी) नुसार, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हितेश जैन आणि कविता यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा उलगडा झाला आहे. या दोघांमधील प्रेमसंबंध हे मागच्या 10 वर्षांपासून सुरू असल्याचे समोर आले आहे.

या आरोपी हितेश जैन आणि कविता यांना विवाह करायचा होता. त्यामुळे त्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या कमलकांतला दूर करण्याचा कट आखला. कमलकांतला मारल्यानंतर दोघेही विवाह करणार होते, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांना 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

First published:

Tags: Crime, Crime news, Mumbai, Murder, Poison