Home /News /maharashtra /

Kishori Pednekar Shiv Sena : ‘ही कमळी घात करणार बाळासाहेब म्हणायचे त्यावेळी सदा सरवणकरांना दिसले नाही का’

Kishori Pednekar Shiv Sena : ‘ही कमळी घात करणार बाळासाहेब म्हणायचे त्यावेळी सदा सरवणकरांना दिसले नाही का’

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai mayor kishor pednekar) आणि आमदार सदा सरवणकर यांच्याशी थेट मुलाखत झाली.

  मुंबई, 28 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर (mahavikas aghadi government) अस्थिरतेचे संकट आले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह (eknath shinde in guwahati) गुवाहाटी गाठले यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान http://news18 lokmat वर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai mayor kishor pednekar) आणि आमदार सदा सरवणकर यांच्याशी थेट मुलाखत झाली. यामध्ये किशोरी पेडणेकर यांनी आमदार सरवणकर (mla sada sarvankar) यांना बाळासाहेबांची आठवण करून दिली. यानंतर सरवणकर यांची बोलती बंद झाल्याचे दिसून आले.

  दरम्यान किशोरी पेडणेकर आणि सदा सरवणकर यांच्यात थेट बोलणे झाल्याने दोघांनीही शिवसेनेत ज्या काही गोष्टी घडल्या त्याबाबत आरोप प्रत्यारोप केले. सदा सरवणकर यांनी त्यांच्या मतदार संघात झालेल्या त्रासाचा पाढा वाचून दाखवला. यावर महापौर किशोर पेडणेकर म्हणाल्या कि, सदा सरवणकर हे माझे बंधू आहेत त्यांच्या व्यथा आम्हाला माहिती आहेत त्यांना जो काही त्रास झाला असेल तो त्यांनी समोर येऊन बोलायला हवा होता. सुरतमार्गे गुवाहाटीला जाऊन तिथे बसून कोणावर बोलण्यापेक्षा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करायला  हवी होती. 

  हे ही वाचाउद्धव ठाकरेंनी खरंच फडणवीसांना फोन केला का? 'मातोश्री'वरून आला खुलासा

  यानंतर सदासरवणकर म्हणाले कि, आम्ही वेळोवेळी तक्रार करूनही मागच्या अडिच वर्षात कोणीही ऐकले नाही. घटक पक्षांनी आमच्या कित्येक योजनांवर टाच आणण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला दुजाभावाने वागणूक दिली असल्याचे ते म्हणाले. यामुळे आम्ही बंड केले. यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या कि, मागच्यावेळी भाजपसोबत आपण होतो त्यावेळी भाजपविरोधातही आपण असेच बोलत होतो. यावर बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे ही कमळा आपला घात करणार यावेळी तुम्हाल बाळासाहेब आठवले नाहीत का? असा सवाल केल्यावर सदा सरवणकर यांची बोलती बंद झाल्याचे दिसून आले.

  उद्धव ठाकरेंनी खरंच फडणवीसांना फोन केला का? 'मातोश्री'वरून आला खुलासा

  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे ३८ आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. सुप्रीम कोर्टाने आमदारांना कारवाई करण्यापासून एकाप्रकारे संरक्षण दिले आहे. त्यामुळे आता भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. अशातचएकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. एवढच नाहीतर मिलिंद नार्वेकर यांनाही सुरतमध्ये पाठवले होते. 

  हे ही वाचा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात पंतप्रधानांची एन्ट्री; अमित शाह आणि जे पी नड्डांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

  पण, एकनाथ शिंदेंनी काही ऐकलं नाही. शिंदेंनी फक्त महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवरून याच्या पाठीमागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे २१ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली. पण फडणवीस यांनी फोन उचलला नाही. उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा फोन केला पण तरीही फडणवीस यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.अशी चर्चा रंगली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kishori pedanekar, Mumbai, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या