मुंबई, 12 जुलै: बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांच्यासह त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही पिता-पुत्रांना मुंबईतल्या नानावटी हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) महापौर किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबीय लवकरच कोरोनामुक्त होतील, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. हेही वाचा… बच्चन कुटुंबाला दिलासा! ऐश्वर्या, जया बच्चन आणि आराध्या यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह अमिताभ बच्चन हे सगळ्यांचे बिग बी आहेत. बॉलिवूडचे मोठे स्टार आहेत. त्यांचे कोट्यावधी चाहते आहेत. सगळे चाहते अमिताभ यांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहे. त्यामुळे ते लवकरच कोरोनावर मात करून सुखरूप घरी परत येतील, असा विश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे. अमिताभ यांच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सेलिब्रिटी कोणताही असो, तो कोणत्याही परिसरातील असो, बीएमसी कुठलाही भेदभाव करत नाही. सगळ्यांनी नियमांचं पालण करावे, असही किशोरी पेडणेकर यांनी यावेळी सांगितले. किशोरी पेडणेकरांनी दिला इशारा.. बच्चन कुटूंब, अनुपम खेर आणि रेखा यांच्या बंगल्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बीएमसीने तिन्ही सेलिब्रिटींचे बंगले सॅनिटाईज केले आहे. त्यांच्या प्रत्येक स्टाफची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. काही वेळा तर हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी येऊ देत नाही. सोसायटीतील लोक स्वत:चे नियम बनवतात, याबाबत चौकशी करण्यात येईल, असा इशाराही किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. तसेच राजभवनातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही चिंतेची बाब असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे. हेही वाचा… कोरोनाची लस अंतिम टप्प्यात! ‘हा’ देश करणार तब्बल 20 कोटी व्हॅक्सिनचे उत्पादन दुसरीकडे, अमिताभ यांच्या जनक आणि जलसा या बंगल्यात राहणाऱ्या सगळ्यांची आता कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. प्रशासनाने नानावटी हॉस्पिटलबाहेर पोलिस बंदोबस्तही वाढवला आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी गर्दी करू नये, यासाठी पोलिस मोठ्या संख्येने तैनात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.