मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी; काम युद्धपातळीवर, कधी होणार पूर्ण?

मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी; काम युद्धपातळीवर, कधी होणार पूर्ण?

mumbai goa highway

mumbai goa highway

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत महत्त्वाची माहिती विधान परिषदेत दिलीय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, २१ मार्च : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत महत्त्वाची माहिती विधान परिषदेत दिलीय. या महामार्गावर ८४ किमी रस्त्याचे चौपदीरकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असेल. यातील एका मार्गिकेचं काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. तर दुसऱ्या मार्गिकेचं कामही लवकर पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.

महामार्गाच्या कामाला येत्या गुरुवारपासून वेगाने सुरूवात करण्यात येईल. या कामाचे कंत्राट दोन ठेकेदारांना देण्यात आलं असून सकाळ ते संध्याकाळ १० ड्रोनच्या माध्यमातून या कामावर लक्षही ठेवलं जाईल असंही रवींद्र चव्हाण म्हणाले. बांदा ते राजापूर या रस्त्याचं चौपदरीकरण झालं आहे. तर परशुराम घाट रस्ता आणि डोंगराळ भागातली कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.

आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य, अंगावर काटा आणणारी घटना 

पनवेल ते इंदापूर हा मार्ग ८४ किमीचा आहे. याच्या कामात अनेक अडथळे आले, पण त्यातून मार्ग काढण्यात आला. रस्त्यासाठी १०० टक्के भूसंपादन झाले असून त्याचे पैसे राज्य सरकारकडे जमा आहेत. जमिनीच्या भरपाईबाबत काही कुटुंबात अंतर्गत मतभेद आहेत. ते संपुष्टात आल्यानतंर भरपाईची रक्कम संबंधितांना देण्यात येईल असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Goa, Mumbai, Panvel