जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai Bar in Toilet : चक्क, सार्वजनिक शौचालयातच थाटला बार, नवी मुंबईतला धक्कादायक प्रकार

Mumbai Bar in Toilet : चक्क, सार्वजनिक शौचालयातच थाटला बार, नवी मुंबईतला धक्कादायक प्रकार

Mumbai Bar in Toilet : चक्क, सार्वजनिक शौचालयातच थाटला बार, नवी मुंबईतला धक्कादायक प्रकार

मुंबई कोणत्या क्षणी काय घडेल काहीच सांगता येत नाही. असाच एख प्रकार नवी मुंबईत असणाऱ्या एपीएमसी मार्केटमध्ये समोर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 फेब्रुवारी : मुंबई कोणत्या क्षणी काय घडेल काहीच सांगता येत नाही. असाच एख प्रकार नवी मुंबईत असणाऱ्या एपीएमसी मार्केटमध्ये समोर आला आहे. यापूर्वी आणि सरकारची जागा बळकवून अतिक्रमण केलेल्या गोष्टी ऐकल्या असतील. परंतु सरकारचे सार्वजणीक शौचालय बळकावून कधी बार केल्याची घटना तुम्ही ऐकली आहे का? असाच प्रकार मुंबईत घडला आहे. मुंबईतील एपीएमसीमध्ये शौचालयाचे बारमध्ये रुपांतर करण्यात आले आहे.

जाहिरात

एपीएमसीमध्ये घडलेला हा प्रकार मनसेने उघड केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर प्रमुख विनोद पार्टे यांनी याबाबत खुलासा केला आहे. नवी मुंबईतील तुर्भे विभागात सार्वजनिक शौचालयाचे बारमध्ये रूपांतर करण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एपीएमसी ट्रक टर्मिनल जवळ येणाऱ्या नागरिकांसाठी हे शौचालय बांधण्यात आले होते. याठिकाणी असला प्रकार सुरू असल्याची बाब मनसेच्या विनोद पार्टे यांनी उघड केली आहे.

हे ही वाचा :  जमिनीच्या तुकड्यासाठी काका सैतान झाला, 4 वर्षांच्या पुतणीचा खून केला आणि…

यालगत असणाऱ्या एका बार व्यवसायिकाने त्यावर अतिक्रमण करीत या शौचालयाच्या आतमध्ये थेट बारची निर्मिती केलीय. बार मालकाने अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच हे धाडस केल्याचा आरोप पार्टे यांनी केला आहे. काही मनसे कार्यकर्त्यांनी याठिकाणी जात हे प्रकरण बाहेर काढल्याने ही धक्कादायक बाब समोर आणली आहे. दरम्यान या कारभाराबाबत प्रशासनाच्या काळ्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केला आहे.

जाहिरात

मनपाच्या अधिकाऱ्याचा हस्तक्षेप असल्याचा आरोप करत यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे. या ठिकाणी बारच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता बार मालक कोण या विषयी माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा :  8 वर्षांचे प्रेम, पतीला घेऊन तरुणी थेट पोलीस ठाण्यात, प्रकरण समजल्यानंतर पोलिसांनाही धक्का

मात्र सदर शौचालय हे महानगर पालिकेच्या मालकीचे नसून सिडकोकडे आहे. त्यामुळे त्याच्यावर सिडकोचा अधिकार आहे. सदर परिस्थिती बाबत सिडकोला पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात