हल्द्वानी, 20 : देशात दिवसेंदिवस प्रेमप्रकरणातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विचित्र प्रेम प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. एक तरुणी रविवारी नैनिताल रोडवर असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने पोलिसांना जे सांगितले ते ऐकून पोलिस अधिकारीही आश्चर्यचकित झाले. ती तरुणी पोलिसांना म्हणाली की, ‘माझे 8 वर्षांचे प्रेम आहे, त्यामुळे असे कसे सोडून देऊ, पण याच्यासोबत राहणेही शक्य नाही.’ पण अनेक प्रयत्नानंतर युवतीने आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करायला तयार झाली. मिलालेल्या माहितीनुसार, हरियाणा येथील रहिवासी युवती आणि एक युवक रविवारी पोलीस ठाण्यात पोहोचले. हा तरुण तिचा पती होता. रडत रडत या तरुणीने पतीवर कारवाई करण्याची विनंती पोलिसांना केली. या तरुणीने सांगितले की, दोघेही गेल्या 8 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. आर्थिकदृष्ट्या भक्कम कुटुंब सोडून ती या तरुणासोबत दोन वर्षांपूर्वी डेहराडूनला आली. स्टॅम्प पेपरवर लिहून तिने त्याच्यासोबत लग्न केले. तरुण माझ्यावर नीट प्रेम करत नाही - तरुणीने सांगितले की, हा तरुण हल्द्वानी येथे राहत असून एका सराफा व्यापाऱ्याची कार चालवतो. तिने पुढे सांगितले की, आता तो तरुण तिच्यावर प्रेम करत नाही आणि तिला नीट ठेवत नाही. तिचे संभाषण ऐकून पोलिसांनी या तरुणीला हरियाणाला परतण्याचा सल्ला दिला, त्यानंतर ती संतापली. ती म्हणाली, ‘8 वर्षांचे प्रेम, मी अशी कशी निघून जाऊ? पण त्यासोबत जगणेही शक्य नाही. हेही वाचा - लग्नाला जाण्यापासून रोखल्यावर पत्नीने दिला जीव, पतीनेही उचलले भयानक पाऊल त्यानंतर पोलिसांनी तरुणावर कारवाई करण्यास सांगितले. मात्र, तरुणीने त्यालाही नकार दिला. या प्रकरणाचे समाधान व्हावे, बस हीच तरुणीची इच्छा होती. पतीने आपल्याशी पूर्वीसारखे वागावे, अशी तिची इच्छा होती. तर दुसरीकडे तरुण हात जोडून शांतपणे तरुणीचे आरोप ऐकत राहिला. बराच वेळ समजावून सांगितल्यानंतर तरुणीने गुन्हा दाखल करण्यास होकार दिला. हा विषय दिवसभर शहरात चर्चेचा विषय राहिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.