सोलापूरमध्ये जमिनीच्या वाटणीच्या वादात काकानेच केला पुतनीचा घात, मागच्या कित्येक महिन्यांपासून तो वाद घालत तुमचा वंशज संपवणार अशी भाषा करत होता.
आईच्या नावावर असलेली शेतजमीन नावावर करुन देण्यासाठी सख्ख्या भावाशी झालेल्या वादात पुतणीला नदीत फेकून हत्या केल्याचा काकावर आरोप करण्यात आला आहे.
ज्ञानदा यशोधन धावणे असे चार वर्षीय मृत चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान आरोपी वारंवार घरी भांडण काढत होता परंतु गावकऱ्यांच्या मदतीने भांडणे मिटवण्याचा प्रयत्न व्हायचा
आईच्या नावावर असलेली 6 एकर जमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी अवघ्या 4 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
काका यशोदीप धाकणे याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान काका अद्यापही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.