मुंबई, 23 सप्टेंबर : NIA आणि ATS कडून काल(दि.23) गुरुवारी पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या (PFI) देशभरातील मालमत्ता आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. (Mumbai ATS NIA) यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, पुणे, कोल्हापूर, नाशिक याठिकाणी पीआयएफच्या कार्यालयांची NIA, ATS, ED कडून तपासणी सुरू आहे. दरम्यान PFI संबंधित असलेल्या हस्तकांच्या घरांवरही छापे टाकण्यात येत आहेत. यामध्ये भिवंडी आणि कोल्हापूर येथील संशयितांच्या घरावर छापे टाकण्यात आले. दरम्यान 2006 च्या भिवंडी दंगलीतील संशयीत आरोपी मोईनुद्दीन मोमीन याच्या घरावरही छापे टाकण्यात आले यामध्ये PFI संबंधित साहित्य सापडल्याची माहिती देण्यात आली आहे.
सध्या ईडी आणि एनआयएकडून झाडाझडती सुरु आहे. नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात सेक्टर 23 मध्ये असणाऱ्या दारावे गावात पीआयएफच्या कार्यालयावर धाड पडली आहे. या सगळ्या धाडसत्रातून नेमकी काय माहिती पुढे येणार हे पाहावे लागेल. याशिवाय, मालेगावमध्ये पीएफआय संघटनेच्या एका सदस्याला पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे. सैफुरहेमान असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान भिवंडीतील मोईनुद्दीन मोमीन याच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये काही साहित्य सापडल्याचेही सांंगण्यात आले आहे.
मोईनुद्दीन मोमीन आणी PFI
- ATS ने अटक केलेल्या 5 आरोपींमध्ये भिवंडी येथील मोईनुद्दीन मोमीन आहे.
- ATS ला त्याच्या घरातून SDPI आणि PFI चे काही पोस्टर्स सापडले आहेत.
- 38 वर्षीय आरोपी मोइनुद्दीन मोमीन हा चॉकलेट, बिस्किटे आणि इतर वस्तू बाजारात घाऊक दरात विकण्याचे काम करतो.
- कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार,त्यानं अनेक वर्षांपूर्वी PFI सोडले होते, आणि SDPI शी संबंधित होते.
- परंतु तो कोणत्याही देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी नव्हता.
- पीएफआयच्या संशयित कारवायांमध्ये सहभागी असलेला अटक आरोपी मोईनुद्दीन मोमीन याला 5 जुलै 2006 च्या दंगलीप्रकरणी भिवंडी पोलिसांनी 2019 मध्ये अटक केली होती.
- त्या दंगलीत मॉब लिचिंगमध्ये 2 पोलिसांचा मृत्यू झाला होता.त्या प्रकरणी मोईनुद्दीन मोमीनला अटक करण्यात आली होती.
- भिवंडी पोलिसांनी 2006 च्या दंगलीतील फरार असलेल्या मोईनुद्दीन मोमीनला तब्बल 17 वर्षांनंतर गुप्त माहिती आधारावर अटक केली.
- 5 जुलै 2006 रोजी भिवंडीतील कोटारगेट येथे मशिदीजवळ पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी निषेध रॅली काढण्यात आली होती.
- त्यावेळी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी जमिनीवर,हवेत गोळीबार सुरू केला, पण त्याच दरम्यान मोईनुद्दीन गुलाम हुसेन मोमीन यांच्या पायात गोळी लागली आणि खासगी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर मोमीन भूमिगत झाला.
- पोलिसांच्या आरोपपत्रातही त्याचे नाव नव्हते.
- पण 2019 मध्ये एका गुप्तचराच्या माहितीवरून त्याला 5 जुलै 2006 च्या दंगलीप्रकरणी अटक करण्यात आली होती.
- मात्र नंतर त्याला जामीन मिळाला होता.
- पीएफआयशी संबंध आणि देशविरोधी कारवायांमध्ये संशयित भूमिकेमुळे,एटीएसने भिवंडीतील घरावर छापा टाकला जिथे एसडीपीआय आणि पीएफआयची पोस्टर्स जप्त करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATS, Bhiwandi, Mumbai ATS, Mumbai police, Nia