प्रतिनिधी राहुल खंदारे बुलडाणा : समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. महामार्गावर ट्रकचा अपघात झाला. माशांनी भरलेला ट्रक उलटा झाला आणि सगळे मासे रस्त्यावर विखुरले होते. बुलडाणा जिल्ह्यातून मेहकर सिंदखेडराजा जवळून समृद्धी महामार्गावर ही घटना घडली. याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की समृद्धी महामार्गावर किती मासे पडले आहेत ते दिसत आहेत.
ट्रकचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मासे घेऊन जाणाऱ्या ट्रक चा अपघात झाला हे स्थानिक नागरिकांना कळताच नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या मासे गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली.
पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होईल अपघातग्रस्त ट्रक बाजूला करत मासे गोळा करण्यासाठी झालेली गर्दी बाजूला केली. लोकांनी मासे घेऊन जाण्यासाठी ही गर्दी केली होती. खवय्यांच्या तर हे मासे पाहूनच तोंडाला पाणी सुटले असेल. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
समृद्धी महामार्गावर माशांचा पाऊस, लोकांनी पातेलं भरून घरी नेले मासे, VIDEO pic.twitter.com/QzYDAKUMnY
— News18Lokmat (@News18lokmat) March 25, 2023
दुसरीकडे मलकापूर जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरती कंटेनर उलटला आहे. रात्रीच्या सुमारास तालासवाडा फाट्याजवळ ही घटना घडली आहे. दसरखेड कडून मलकापूर दिशेने भरधाव वेगाने येत असलेले कंटेनर हे वाहन पलटी झाले. सुदैवाने यात कुठलेही जीवित हानी झाली नाही. कंटेनर मध्ये असलेल्या स्टाइल्स च्या मालाचे तुकडे तुकडे होऊन नुकसान झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana, Buldhana news