जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वडील मुख्यमंत्री, 'आपलं'च सरकार, तरीही श्रीकांत शिंदेंचा आंदोलनाचा इशारा

वडील मुख्यमंत्री, 'आपलं'च सरकार, तरीही श्रीकांत शिंदेंचा आंदोलनाचा इशारा

Shrikant Shinde Eknath Shinde

Shrikant Shinde Eknath Shinde

मुंबईतल्या काही ठिकाणी सुरू असलेल्या एसी लोकलच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 ऑगस्ट : एसी लोकलची (Mumbai AC Local) संख्या वाढवल्यानंतर सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे मुंबईमध्ये काही ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. आजही एसी लोकलमुळे सामान्य फास्ट लोकल रद्द करण्यात आली, त्यानंतरच्या लोकलला दोन गाड्यांची गर्दी झाली, त्यामुळे बदलापूर स्टेशनवर प्रवाशांनी आंदोलन केलं. याआधी एसी लोकलमुळे कळवा स्टेशनवरही आंदोलन करण्यात आलं. मुंबईतल्या काही ठिकाणी सुरू असलेल्या या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी एसी लोकलच्या मुद्द्यावरून आज रेल्वेच्या जीएम यांची भेट घेतली आणि त्यांना काही पर्याय सुचवले. लोकांना त्यांच्या सध्या लोकल हव्या आहेत, त्यांना त्या देवून अतिरिक्त एसी लोकल देण्यात याव्यात, अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी जीएमना भेटल्यानंतर केली. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये यावर तोडगा काढू, असं आश्वासन जीएम यांनी दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं. ‘आम्ही काही डबे एसी आणि काही नॉन एसी करता येतील का? सहा डबे एसी आणि सहा नॉन एसी करता येतील का ते पाहा, असं जीएमना सांगण्यात आलं आहे,’ अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली. मुंबईतल्या सर्व लोकल 5 डब्यांच्या करण्यात याव्यात अशीही आमची मागणी आहे. एसी लोकलचा प्रश्न लवकर सोडवला जाईल, असं त्यांनी सांगितलं, पण तसं झालं नाही तर आम्ही जनतेच्या सोबत आंदोलन करू, असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी दिला. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही विधानसभेत एसी लोकलच्या मुद्द्यावरून कळवा कारशेडमध्ये झालेल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला होता. ‘रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांसाठी जीवाचा खेळ झाला आहे. ज्याची गरज आहे त्याकडे लक्ष न देता ज्याची गरज नाही; त्या सोईसुविधा वाढविण्यासाठी रेल्वे प्रयत्न करीत आहे. 90 टक्के लोकांना एसी लोकलची गरजच नाहीये’, असं आव्हाड विधानसभेत म्हणाले. ‘90 टक्के लोकांना एसी लोकलची गरज नाही’, जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत दावा कळवा ते सीएसएमटी एसी ट्रेनचं रिटर्न तिकीट 200 रुपये आहे, तर लोकलचा सामान्य महिन्याचा पास 215 रुपये आहे, त्यामुळे लोकांच्या मनात उद्रेक आहे. हा उद्रेक मुंबईमध्ये दिसत आहे. कोणीही न बोलावता 700 लोक येणं हे आश्चर्यकारक आहे. शासनाने हा प्रश्न गांभिर्याने घ्यावा. हे कायदा सुव्यवस्थेमध्ये रुपांतरित होऊ शकतं, अशी भीती जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात