मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MPSC Special: जिद्दीनं आणि मेहनतीनं तहसीलदारपदी झाली निवड पण नियुक्तीच नाही; अखेर निरंजननं निवडला 'हा' मार्ग

MPSC Special: जिद्दीनं आणि मेहनतीनं तहसीलदारपदी झाली निवड पण नियुक्तीच नाही; अखेर निरंजननं निवडला 'हा' मार्ग

असे अनेक स्वप्नील आहेत ज्यांचा संघर्ष आणि कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

असे अनेक स्वप्नील आहेत ज्यांचा संघर्ष आणि कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

असे अनेक स्वप्नील आहेत ज्यांचा संघर्ष आणि कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

मुंबई, 05 जुलै: पुण्यातील स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar death) या MPSC च्या विद्यार्थ्यानं बेरोजगारीला (Unemployment) कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरला. स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या व्यथा जगासमोर आल्या. पण राज्यात स्वप्नील सारखेच असे अनेक होतकरू विद्यार्थी आहेत जे MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरीच्या प्रतीक्षेत (No Job after MPSC) आहेत. अशाच काही विद्यार्थ्यांच म्हणणं आपण या सिरिजमधून जाणून घेणार आहोत. या सिरीजचा हा पहिला भाग आहे.

MPSC उत्तीर्ण होऊन तसंच मुलाखतीत तहसीलदार (Tehsildar) हे पद मिळवून सुद्धा अजूनही नियुक्ती न मिळालेले असे अनेक स्वप्नील आहेत ज्यांचा संघर्ष आणि कहाणी आपण जाणून घेणार आहोत.  त्यातीलच एक आहे निरंजन कदम.

निरंजन हा मूळचा यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील विद्यार्थी. फार्मसीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर निरंजनला UPSC ची ओढ लागली. त्यानुसार त्यानं अभ्यास करून परीक्षा दिली मात्र हाती निराशा आली. केंद्रीय नाही तर राज्य सेवा आयोगाची परीक्षा देण्याचं त्यानं ठरवलं. अखेर 2013 पासून अभ्यासाला सुरुवात केली.

अभ्यासासाठी थेट पुणे (Pune News) गाठलं. मात्र पुण्यात राहायचं म्हंटलं तर पैशांची चणचण भासत होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे घरी पैसे कसे मागणार असा प्रश्न निरंजनसमोर होता. मात्र MPSC ची जिद्द शांत बसू देत नव्हती. अखेर त्यानं पुण्यात पार्ट टाइम जॉब (Part Time Job) करायला सुरुवात केली आणि त्यासोबत अभ्यासही सुरु ठेवला. अनेक वेळा MPSC ची पूर्व आणि मुख्य परीक्षा दिल्यानंतर 2019 ची मुख्य परीक्षा निरंजननं पास केली. यानंतर मुलाखतीत (Interview) त्याची  तहसीलदार म्हणून निवडही करण्यात आली. मात्र तोपर्यंत मार्च 2020 उजाडला होता. आपली बेरोजगारी आता कायमची दूर होणार या आनंदात असतानाच कोरोना आला आणि सगळं गणितच बिघडलं.

हे वाचा - MPSC विध्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर प्रवीणचा संताप; म्हणाला, जगणार फक्त राजकारणी

कोरोनामुळे (Corona Virus) संपूर्ण देश लॉकडाउन झाला आणि त्यासोबत नियुक्तीही. कोरोनाचं कारण पुढे करत नियुक्ती तर रखडलीच मात्र आता नोकरी राहणार की जाणार हा प्रश्न निरंजनसमोर होता. जुलै 2020 मध्ये नियम शिथिल झाल्याबरोबर निरंजन आणि त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी थेट मंत्रालयापर्यंत समोर साधून नियुक्तीबद्दल विचारणा केली. मात्र सतत उडवाउडवीची उत्तरं त्याच्या कानावर आलीत. त्यात मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) स्थगिती आल्यामुळे नियुक्तीही अडकली.  2019 साली त्यानं MPSC ची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आणि तहसीलदार पद मिळवलं. मात्र आज वर्ष उलटूनही निरंजनला राज्य सरकारकडून (Maharashtra State Government) नियुक्ती देण्यात आलेली नाही.

"स्वप्नील लोणकर या MPSC विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचं वृत्त कळताच मनात घालमेल सुरु झाली. वाटलं स्वप्निलसारखे असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना अजूनही नोकरी मिळाली नाही. वर्षभरापासून नोकरी नसल्यामुळे नाईलाजानं मला गावी परतावं लागलं. तहसीलदार म्हणून निवड झाल्यानंतरचा आनंद नोकरी नाही म्हणून कुठच्या कुठे निघून गेला. त्यात गावातील लोक आणि नातेवाईक सतत काय काम करतोस? असा प्रश्न करतात. घरची आर्थिक परिस्थितीही ठीक नाही  मात्र खचून जाणं हा पर्याय नाही." असं निरंजन सांगतो.

आता काय करतो निरंजन

परीक्षा पास होऊनही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे गावी परत यावं लागलं. आता गावातील आणि इतर काही मुलांना MPSC किंवा स्पर्धा परीक्षांची (Competitive Exams) तयारी नक्की कशी करावी याबाबत निरंजन ऑनलाइन क्लासेस घेतात. मात्र यात त्यांना समाजसेवेचं त्यांचं स्वप्न पूर्ण करता येत नाही. तसंच सोशल मीडियावरही (Social Media) होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. मात्र नियुक्ती न झाल्याची खंत त्यांच्या मनात अजूनही कायम आहे.

हे वाचा -लेटरबॉम्बनंतर आमदार प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया

सरकारकडून अपेक्षा

"राज्यात MPSC वगळता इतर सर्व ठिकाणी पदभरती आणि नियुक्ती सुरु आहे. मग आमचीच नियुक्ती का नाही? राज्य सरकारनं लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन MPSC च्या विद्यार्थ्यांची पदभरती करावी आणि नियुक्ती करावी अशी मागणी निरंजन कदम यानं केली आहे. तसंच परिस्थिती वाईट असली तरी खचून जायचं नाही लढत राहायचं एक दिवस यश नक्की मिळणार असंही निरंजन कदम यानं सांगितलं आहे. आता राज्य सरकार MPSC च्या नियुक्त्या कधी करतील हेच बघणं महत्त्वाचं ठरेल.

या  MPSC Special सिरीजच्या माध्यमातून यापुढेही आम्ही तुम्हाला अशाच काही विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा आणि जिद्दीचा परिचय करून देणार आहोत.

First published:
top videos

    Tags: Jobs, Maharashtra News, Mpsc examination, Students