मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तरुणीला 5 डोळे आणि 5 ओठ; VIDEO पाहून डोकं चक्रावेल, काय आहे यामागील सत्य?

तरुणीला 5 डोळे आणि 5 ओठ; VIDEO पाहून डोकं चक्रावेल, काय आहे यामागील सत्य?

VIDEO पाहून खरे डोळे आणि ओठ शोधून दाखला...

VIDEO पाहून खरे डोळे आणि ओठ शोधून दाखला...

VIDEO पाहून खरे डोळे आणि ओठ शोधून दाखला...

  • Published by:  Meenal Gangurde

तुम्ही असे अनेक मेकअप आर्टिस्ट्स (Makeup artists) पाहिले असतील जे आपल्या कौशल्याने समोरच्याचा शानदार मेकओव्हर (Makeover) करतात. मात्र अशाच मेकअप आर्टिस्ट कलाकाराचा एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीचा असा काही मेकअप केला आहे, जो पाहून तुमचं डोकं चक्रावून जाईल.

@RexChapman नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीला 5 डोळे, 5 ओठ दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. रेक्स चॅपमॅन (Rex Chapman) अमेरिकेचा बास्केटबॉल प्लेयर (American former Basket ball player) राहिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये जे दाखवलं ती सर्व मेकअपची कमाल आहे. मेकअप आर्टिस्टने अत्यंत सफाईदारपणे चेहऱ्यावर खोटे डोळे आणि ओठ तयार केले आहे. ज्यामुळे खरे डोळे आणि ओठ कोणते हे ओळखणं अवघड झालं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहत आहात की, तरुणी ओठांवर लिपस्टिक लावत आहे. ज्याच्या काही सेंकदनंतर तरुणी डोळे उघतले. तेव्हा लक्षात येतं की आर्टिस्टने डोळ्यांवर खोटे ओठ तयार केले आहेत. त्याशिवाय शेजारील डोळ्यावर त्याने एक खोटा डोळा तयार केला आहे. खोटे डोळे आणि ओठांशिवाय कलाकाराने खोटं नाकदेखील तयार केलं आहे. (woman has 5 eyes and 5 lips What is the truth behind viral video )

हे ही वाचा-VIDEO कुत्र्यांसमोर नाचणाऱ्या 'बसंती'चा डान्स सुपरहिट; इंटरनेटवर तुफान व्हायरल

पाहणाऱ्यांनी आपलं डोकंच पकडलं

व्हिडीओमध्ये तरुणीला पाहून नेमका प्रकार लक्षात येत नाही. हा व्हिडीओ पाहून लोक प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओवर लोकांच्या मिक्स रिएक्शन्स (Mix reactions) येत आहेत. काहींनी आवर्जुन हा व्हिडीओ पाहिला तर काहींना हा व्हिडीओ क्रीपी (Creepy) वाटला आहे. याशिवाय लोकांना या व्हिडीओवर दिलेली कॅप्शन 'वेन द एडिबल्स हिट' (When the edibles hit) याचाही अर्थ कळत नाही.

First published:

Tags: Shocking viral video, Video viral