परभणी, 01 फेब्रुवारी : परभणी (parbhani) जिल्ह्यातील वसमत महामार्गावर एका ऑटो रिक्षा पलटी (Auto rickshaw accident) होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेला आणि तिच्या लहान मुलाचा मृत्यू झाला. मायलेकरांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. परभरणीतील रहाटी गाव शिवारामध्ये आज दुपारी हा अपघात घडला. पद्मिनी शिंदे (वय 30) आणि वैभव शिंदे (वय 1 वर्ष) अशी मृतांची नाव आहे. अपघातग्रस्त ऑटो रिक्षा हा परभणीहून रहाटीकडे जात होता. पण, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ऑटो पलटी झाला. रिक्षाचा वेग जास्त असल्यामुळे रिक्षात बसलेली माय लेकर बाहेर फेकली गेली. जबर मार लागल्यामुळे या अपघातात या माय, लेकराचा करून अंत झाला. मागील अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू असून काम रखडल्याने हा अपघात झाल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहे. या अगोदरही या रस्त्यावर अनेक वेळा अपघात घडले आहेत. परंतु, तरी देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे किती लोकांचे प्राण गेल्यावर प्रशासन जागे होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केमिकल टँकर आणि ट्रकच्या धडकेनंतर स्फोट, 2 जणांचा होरपळून मृत्यू दरम्यान, धुळ्यात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Agra National Highway) केमिकल टँकरने (chemical tanker) ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. टँकरने धडक दिल्यामुळे आगडोंब उसळला. या अपघातात 2 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आला आहे. जिल्ह्यातील पळासनेर गावाजवळ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. ४.२० वाजेच्या सुमारासही घटना घडली. मध्यप्रदेशहुन महाराष्ट्रात भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, केमिकलने भरलेला टँकर पलटी झाला. काही कळायच्या आता टँकरने पेट घेतला. यावेळी टँकरमधून मोठा स्फोट होऊन आगीने रौद्ररूप धारण केलं केलं होतं. हा अपघात इतका भीषण होता की, काही क्षणात संपूर्ण टँकर जळुन खाक झाला असून यात टँकर चालक व सहचालक अडकून आगीत होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.