Covid पूर्ण आटोक्यात आल्याशिवाय किंवा लशीशिवाय मुलांना शाळेत पाठवणार नाही - 75 टक्क्यांहून अधिक मराठी पालकांचं मत

Covid पूर्ण आटोक्यात आल्याशिवाय किंवा लशीशिवाय मुलांना शाळेत पाठवणार नाही - 75 टक्क्यांहून अधिक मराठी पालकांचं मत

ऑनलाईन वर्ग सुरू आहेत तोपर्यंत शाळेनं पूर्ण फी घेऊ नये असं 88.8 टक्के मराठी पालकांना वाटतं. ऑनलाईन शाळेविषयीच्या देशभरातल्या पालकांच्या भावना काय आहेत पाहा सर्व्हेतल्या नोंदी.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै :  Coronavirus च्या प्रभावामुळे या वर्षी अद्याप शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. पण ऑनलाईन वर्ग मात्र सुरू झाले आहेत. या ऑनलाई शाळेबद्दल नागरिकांच्या, पालकांच्या मनात काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी News18 ने एक सर्वेक्षण केलं. ऑनलाइन शिक्षण सुरू असताना शाळांनी पूर्ण फी घ्यावी का? तुमच्या मते शाळा पुन्हा केव्हा सुरू करायला हव्या? काही काळाने शाळा सुरू झाल्या तर तुम्ही तुमच्या पाल्यांना शाळेत पाठवायला तयार आहात का? अशा प्रश्नांना वाचकांनी उत्तरं दिली. त्यात सर्वाधिक मराठी पालकांनी कोरोनाची लस (Covid vaccine) आल्याशिवाय किंवा कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडत नाही तोपर्यंत शाळेत पाठवणार नाही, असं मत व्यक्त केलं आहे.

News18 ने देशभरात घेतलेल्या या ऑनलाईन सर्वेक्षणात 13 भाषांमधल्या डिजिटल माध्यमांवरून प्रश्न विचारले गेले होते. 1.6 लाख लोकांनी या ऑनलाईन सर्व्हेत भाग घेतला. 23 ते 26 जुलै दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात देशभरातल्या 63 टक्के पालकांनी सध्या ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने शाळेने पूर्ण फी घेऊ नये, असं मत व्यक्त केलं आहे.  88.8 टक्के मराठी पालकांना शाळेनं पूर्ण फी घेऊ नये असं वाटतं. 36 टक्के मराठी पालकांनी शाळा सुरू होईपर्यंत फी आकारू नये असं मत व्यक्त केलं आहे.

मराठीबरोबरच इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, तमीळ, मल्याळी, तेलुगू, पंजाबी, आसामी, उडिया आणि उर्दू भाषिक वाचकांनी या Public Sentimeter poll मध्ये सहभाग घेतला.

ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी शिक्षक पुरेसे प्रशिक्षित नाहीत, असं 47 टक्के वाचकांना वाटतं. पण इंग्रजी सोडता अन्य भाषिक वाचकांनी ऑनलाईन शिक्षणाच्या दर्जाविषयी काळजी व्यक्त केली आहे. 60 टक्क्यांहून अधिक मराठी वाचकांनी शिक्षक ऑनलाईन शिकवणी घ्यायला पुरेसे प्रशिक्षित नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. उर्दू पालकांमध्ये हेच प्रमाण 80 टक्के आहे.

63 टक्के लोकांनी कोविडची रुग्णवाढ शून्यावर आल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत, असं मत व्यक्त केलं आहे. रुग्णवाढ शून्यावर यायच्या आधी किंवा लस बाजारात यायच्या आधी तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवणार का, यावर 76.22 टक्के महाराष्ट्रीय पालकांनी नाही असं उत्तर दिलं आहे. देशभराची या प्रश्नावरची आकडेवारी 65.55 टक्के लोकांनी नाही म्हटलं आहे.

Responsive

महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाने 15 जूननंतर ऑनलाईन शाळा घ्यायला परवानगी दिली.  ही शाळा किती तास असावी, कशी घ्यावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शक तत्त्वसुद्धा जाहीर करण्यात आली आहेत. पण शाळांनी या काळात पूर्ण फी घ्यावी का याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 27, 2020, 10:57 PM IST

ताज्या बातम्या