मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Weather Update : Good News! 13 ते 19 मे दरम्यान Monsoon दाखल होणार, IMD चा अंदाज

Weather Update : Good News! 13 ते 19 मे दरम्यान Monsoon दाखल होणार, IMD चा अंदाज

पुढच्या 3 आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता (maharashtra weather update) असल्याचं सांगितले आहे. मान्सून (Monsoon) वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे.

पुढच्या 3 आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता (maharashtra weather update) असल्याचं सांगितले आहे. मान्सून (Monsoon) वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे.

पुढच्या 3 आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता (maharashtra weather update) असल्याचं सांगितले आहे. मान्सून (Monsoon) वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे.

मुंबई 12 मे : महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून असानी चक्रीवादळामुळे (asani cyclone)  ढगाळ वातावरण होते तर काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची (heat wave) शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या 3 आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता (maharashtra weather update) असल्याचे सांगितले आहे. मान्सून (Monsoon) वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. 13 ते 19 मे दरम्यान मान्सूनला सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्याकडून (imd alert) वर्तवण्यात आले आहे.

मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. दरम्यान यंदा चार दिवस आधीच पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये 20 ते 26 मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हे ही वाचा : Shortage of drinking water : राज्यात 281 गावांची पाण्यासाठी वणवण, कोकणात सर्वात जास्त पाणी टंचाई

पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अंदमानानवर आगामी पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर अरबी समुद्रावर दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर भारतात पुढील आठवड्यात मान्सून दाखल होईल.

मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात सकाळच्या वेळेत तीव्र उष्णता जाणवत होती. ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असुनही कोणत्याही जिल्ह्यात अद्याप पाऊस झाला नाही

गेल्या दोन दिवसांत पुण्याच्या कमाल तापमानामध्ये बदल झाला आहे. या महिन्यात पहिल्यांदाच ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पुण्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर दिसून आला नाही. दुसरीकडे, महाराष्ट्रातील काही भागांत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

10 ते 13 मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर 13 मे रोजी पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड आणि अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय 11 ते 13 मे दरम्यान मुंबई, परभणी, कोल्हापूर आणि सातारा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

First published:

Tags: High alert, Monsoon, Weather, Weather forecast