मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Shortage of drinking water : राज्यात 281 गावांची पाण्यासाठी वणवण, कोकणात सर्वात जास्त पाणी टंचाई

Shortage of drinking water : राज्यात 281 गावांची पाण्यासाठी वणवण, कोकणात सर्वात जास्त पाणी टंचाई

राज्यातील 281 गावे, 738 वाड्यांना 270 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा (Water supply by tankers) करण्यात येत आहे. या आठवड्यामध्ये गावांच्या संख्येमध्ये 68 ने तर वाड्या-वस्त्यांच्या संख्येमध्ये 175 ने वाढ झाली आहे.

राज्यातील 281 गावे, 738 वाड्यांना 270 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा (Water supply by tankers) करण्यात येत आहे. या आठवड्यामध्ये गावांच्या संख्येमध्ये 68 ने तर वाड्या-वस्त्यांच्या संख्येमध्ये 175 ने वाढ झाली आहे.

राज्यातील 281 गावे, 738 वाड्यांना 270 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा (Water supply by tankers) करण्यात येत आहे. या आठवड्यामध्ये गावांच्या संख्येमध्ये 68 ने तर वाड्या-वस्त्यांच्या संख्येमध्ये 175 ने वाढ झाली आहे.

मुंबई, 12 मे : राज्यातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती आणि टंचाई (Shortage of drinking water) निवारणाच्या उपाययोजनांबाबतही मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. (Water supply by tankers) यावेळी राज्याच्या पिण्याच्या पाण्याबाबत आढावा घेण्यात आला. राज्यातील मोठे, मध्यम व लघु (Irrigation)पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची माहिती देण्यात आली. यंदा राज्यातील सर्व प्रकल्पांमधील पाणीसाठा 41.19 टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा 39.92 टक्के इतके होता. राज्यातील 281 गावे, 738 वाड्यांना 270 टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील पाणीसाठ्याची टक्केवारी महसूल विभागनिहाय पुढीलप्रमाणे (कंसात गतवर्षीची 2021 मधील टक्केवारी) : अमरावती - 50.08 टक्के (47.25). औरंगाबाद - 50.15 (42.60). कोकण - 47.96 (47.62). नागपूर -37.39 (44.27). नाशिक - 41.04 (43.59). पुणे - 34.11 (32.12टक्के). 

हे ही वाचा : Coronavirus in North Korea: दोन वर्षांत पहिल्यांदाच आढळला कोरोना बाधित, किम जोंग उन ने संपूर्ण देशात लावला Lockdown

टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या गावे, वाड्या आणि टँकर्सची संख्या महसूल विभागनिहाय पुढीलप्रमाणे:  अमरावती - गावे 41, वाड्या - निरंक, टँकर्स - 41 . औरंगाबाद - गावे 14, वाड्या - 1, टँकर्स - 24. कोकण - गावे 111, वाड्या - 366, टँकर्स - 78. नाशिक - गावे 73, वाड्या - 86, टँकर्स - 72. 

पुणे - गावे 42, वाड्या - 285, टँकर्स - 55. नागपूर विभागात कोणतेही गाव, किंवा वाडी-वस्ती यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत नाही. अशारितीने राज्यातील 281 गावे, 738 वाड्यांना 270 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या आठवड्यामध्ये गावांच्या संख्येमध्ये 68 ने तर वाड्या-वस्त्यांच्या संख्येमध्ये 175 ने वाढ झाली आहे. टँकर्सच्या संख्येमध्येही 83ने वाढ झाली आहे. त्यामध्ये 57 शासकीय व 213 खासगी अशा एकूण 270 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मागच्या वर्षी आजच्या स्थितीला राज्यात 356 गावे, 734 गावांना संख्या 277 टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत होता.

दरम्यान धुळे शहरातील देवपूर भागातील दाट वस्ती असलेल्या लाला सरदार नगर मध्ये नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे धुळे महानगरपालिका नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी मोठमोठ्या योजनांच्या वल्गना करीत आहे. मात्र, दुसरीकडे नागरिकांना नऊ ते दहा दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांना स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने अक्षरशा अग्निशामक बंबाच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.

First published:

Tags: Drink water, Maharashtra News, Water crisis, Watersupply पाणीपुरवठा