Home /News /national /

'...नाहीतर फासावर लटकवेल' जिल्हाधिकाऱ्यांची आरोग्य कर्मचाऱ्यांना खुलेआम धमकी, धक्कादायक VIDEO

'...नाहीतर फासावर लटकवेल' जिल्हाधिकाऱ्यांची आरोग्य कर्मचाऱ्यांना खुलेआम धमकी, धक्कादायक VIDEO

Viral Video: देशात ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावलं उचलली जात आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना टार्गेट्स दिले जात आहेत.

    ग्वालियर, 16  डिसेंबर: कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron variant) भारतात शिरकाव झाल्यापासून प्रशासनाची झोप उडाली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावलं उचलली जात आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांचं लसीकरण (Vaccination for all) करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना टार्गेट्स दिले जात आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांचं लसीकरण करत आहेत. पण समाजात लसीकरणाबाबत विविध गैरसमज असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. असं असताना ग्वालियरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा एक धक्कादायक व्हिडीओ (gwalior collector controversial video) समोर आला आहे. ज्यामध्ये जिल्हाधिकारी आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकी देताना दिसत आहेत. त्यांनी लसीकरण न घेणाऱ्या नागरिकांना सोडून आरोग्य कर्मचाऱ्यांनाच झापलं आहे. 'काहीही करा, पण एकही व्यक्ती लसीकरणापासून सुटता कामा नये. एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहिली तर तुम्हाला फासावर लटकवेल' (Threatened to hang) अशा शब्दांत जिल्हाधिकारी आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकावताना दिसत आहेत. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. हेही वाचा-वाऱ्यासारखा पसरतोय Omicron, महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची शक्यता? मीडिया रिपोर्टनुसार, ग्वालियरचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह (Collector Kaushalendra Vikram Singh) यांनी मंगळवारी भितरवार तालुक्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लसीकरण संदर्भात आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना फासावर लटकवण्याची धमकी दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतं असून या घटनेची पुष्टी न्युज 18 करत नाही. या व्हिडीओत जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं की,  'काहीही करा, पण एकही व्यक्ती लसीकरणापासून सुटता कामा नये. एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहिली तर तुम्हाला फासावर लटकवेल.' जिल्हाधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. घरोघरी जाऊ काम करणाऱ्या लसीकरण पथकात आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांना दररोज ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. त्याच्या पाठीवर थाप देण्याऐवजी त्याला फासावर लटकवण्याची भाषा जिल्हाधिकारी करत आहेत. त्यांच्या वक्तव्यामध्ये जंगलराजचं चित्र स्पष्टपणे दिसत असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Madhya pradesh

    पुढील बातम्या