मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धक्कादायक! वानराने महिलेला विहिरीत ढकललं, परिसरात खळबळ

धक्कादायक! वानराने महिलेला विहिरीत ढकललं, परिसरात खळबळ

विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेला वानराने जोरात धक्का दिला. त्यामुळे तोल जाऊन ही महिला विहिरीत पडली आहे.

विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेला वानराने जोरात धक्का दिला. त्यामुळे तोल जाऊन ही महिला विहिरीत पडली आहे.

विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेला वानराने जोरात धक्का दिला. त्यामुळे तोल जाऊन ही महिला विहिरीत पडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

नांदेड : असं म्हणतात की माकड माणसाचं नक्कल करतं. माकडं माणांसकडच्या गोष्टी कुतूहलाने खेचून घेतं किंवा खाण्याचे पदार्थ पळवून नेतं. माकडाच्या मार्कटलीला कधीकधी जीवावर बेतणाऱ्या ठरतात. असाच एक धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. माकडाच्या मार्कटलीला महिलेच्या जीवावर बेतल्या.

विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेला वानराने जोरात धक्का दिला. त्यामुळे तोल जाऊन ही महिला विहिरीत पडली आहे. ही धक्कादायक घटना किनवट तालुक्यातील नांदगाव इथे 30 ऑगस्ट रोजी घडल्याची माहिती मिळाली आहे.

विहिरीशेजारी असलेल्या नागरिकांनी यावेळी सतर्कता दाखवून महिलेला बाहेर काढलं. नाहीतर एका वानरामुळे मोठा अनर्थ घडला असता. वानराने ज्या महिलेला ढकललं तिचं नाव पल्लवी पंडित तांबारे असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा- जळगाव : पत्नीनं घटस्फोट दिला, अन् रागाच्या भरात पोलिसाच्याच लगावली कानशिलात

नेमकं काय घडलं?

पल्लवी आपल्या घराशेजारी असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. यावेळी तिथे वानर आला. त्याचे उपदव्याप सुरू झाले. वानराने पल्लवीला मागून आलेल्या वानराने जोरात धक्का दिला. त्यामुळे पल्लवीचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली.

ही गोष्ट जेव्हा तिथे असलेल्या लोकांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी लगेच पल्लवीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. लोकांच्या सतर्कतेमुळे पल्लवीचा जीव वाचला आहे. वानराच्या उच्छादामुळे पल्लवीच्या जीवावर बेतलं असतं. मात्र नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली.

First published:
top videos

    Tags: Nanded