मुंबई, 02 ऑगस्ट: 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ईडीनं (ED) समन्स बजावला आहे. तसंच त्यांचा - मुलगा ऋृषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावला आहे. या समन्सनुसार (summon) अनिल देशमुख यांना आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखांना ई़डीने (ED Office) चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. तिसऱ्या समन्सनंतरही अनिल देशमुख हे ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत. 30 जुलैला ईडीनं अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावलं. असून चौकशीला हजर न राहिल्यास ईडी कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, देशमुख कुटुंबीय अजूनीही नॉट रिचेबल आहे. त्यामुळे सोमवारी अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला हजर राहणार की नाही, हे पाहावे लागणार आहे. ‘‘तुमच्यात मर्दानगी असेल तर अंगावर या; बोला, येताय अंगावर?’’ अनिल देशमुखांविरोधात CBI चा तपास वेगानं दरम्यान, अनिल देशमुखांविरोधातल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (Central Beureu of Investigation) सर्वांत मोठी छापेमारी (Raids) मोहिम राबवली आहे. अनिल देशमुखांविरोधात असलेल्या वसुली आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सीबीआय (CBI) मार्फत करण्यात आली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी राज्यात 12 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं. त्यासोबतच यासह सीबीआयनंही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरासह काही जागांवर छापे टाकले. राज्यातील मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane), नाशिक, (Nashik), सांगली (Sangli) आणि अहमदनगर येथे सीबीआय अधिकाऱ्यांनी छापे टाकत सर्च ऑपरेशन राबवलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.