बीड, 03 ऑक्टोबर : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात (marathwada rain) हाहाकार उडाला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासकीय मदतीची प्रतिक्षा करत आहे. पण बीडमध्ये (beed) शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्यासाठी पैसे मागतानाचा ( insurance agent) व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीडमध्ये विमा कंपनीच्या एजंटचा एका व्हिडीओ समोर आला आहे. पंचनामा करणारे विमा कंपनीने नेमलेले एजंट ‘जेवढे पैसे काढता येतात तेवढे काढा….गाव सोडू नका..लोकांना थोडं ताणलं की पैसे देतात’ असं एजंटला सांगणारा विमा प्रतिनिधी वडवणी तालुक्यातील आहे.
बीडमध्ये शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्यासाठी पैसे मागतानाचा व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/KhbHIF5e1R
— News18Lokmat (@News18lokmat) October 3, 2021
बीड जिल्ह्यात शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल आहे. यातच विमा कंपनीकडून शेतीचे पंचनामे करण्यासाठी सिमेंटिक टेक्नॉलॉजीज नावाची खासगी कंपनी नेमण्यात आली आहे. या कंपनीच्या एजंट कडून पैसे मागितले जात असल्याची या पूर्वी शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. आता हा व्हिडिओ आल्याने शेतकऱ्यांची लूट कशी होतेय हे दिसत आहे. IPL 2021 : पंजाबला हरवून विराटची RCB प्ले-ऑफमध्ये, आता चौथ्या स्थानासाठी रेस! या व्हिडिओ संदर्भात इन्शुरन्स कंपनीचे बीड जिल्ह्या व्यवस्थापक बाबासाहेब इनकर यांना विचारलं असता संबंधित एजंटवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. सोयाबीन सह शेती वाहून गेली शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेतीसह पीक वाहून गेले. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील भाऊसाहेब दशरथ पांढरे (५५) असं मयताचे नाव आहे अतिवृष्टीच्या नुकसानीचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे. आता फडणवीसांनी टाळला बीडचा दौरा, पंकजा मुंडेंच्या तब्येतीचे दिले कारण! गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील भाऊसाहेब दशरथ पांढरे हे अल्पभूधारक होते. घर बांधणीसाठी त्यांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते, शिवाय सेंट्रल बँकेचे पीककर्जही घेतले होते. शेतात त्यांनी सोयाबीन व कापसाची लागवड केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे पिकासह शेती खरडून वाहून गेली. त्यामुळे अतोनात नुकसान झाले. या नैराश्येतून त्यांनी घराजवळील पत्र्याच्या शेडमागील सुबाभळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.