Home /News /maharashtra /

आता फडणवीसांनी टाळला बीडचा दौरा, पंकजा मुंडेंच्या तब्येतीचे दिले कारण!

आता फडणवीसांनी टाळला बीडचा दौरा, पंकजा मुंडेंच्या तब्येतीचे दिले कारण!

पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी तब्येत बरी नसल्याचं सांगत भेटण्याचं टाळलं आहे. तर...

पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी तब्येत बरी नसल्याचं सांगत भेटण्याचं टाळलं आहे. तर...

पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी तब्येत बरी नसल्याचं सांगत भेटण्याचं टाळलं आहे. तर...

    मुंबई, 03 ऑक्टोबर : भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) सध्या अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. पण, फडणवीसांच्या दौऱ्याआधीच भाजपच्या नेते पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी तब्येत बरी नसल्याचं सांगत भेटण्याचं टाळलं आहे. तर दुसरीकडे आता फडणवीस यांनीही बीडच्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे. आज त्यांनी लातूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आता बीडच्या दौऱ्यावर जाणार अशी माहिती होती. मात्र, फडणवीस सध्या बीडच्या दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे या आजारी असल्यामुळे फडणवीसांनी आपला दौरा रद्द केल्याचे वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे. IPL 2021 : पंजाबला हरवून विराटची RCB प्ले-ऑफमध्ये, आता चौथ्या स्थानासाठी रेस! दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी अचानक प्रकृती खराब झाली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुढील चार दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येण्याआधीच पंकजा मुंडे (pankaja munde tweet) यांनी काढता पाय घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून प्रकृती खराब झाल्याबद्दल माहिती दिली.  घशाला त्रास होत असल्यामुळे बोलण्यास अडचण येत आहे. त्यामुळे पुढील 2 ते 4 दिवस डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला, त्यामुळे कुणाचेही फोन कॉल घेऊ शकत नाही किंवा वैयक्तिकरित्या भेटू शकत नाही' अशी माहिती पंकजांनी दिली. 'तारक मेहता फेम' नट्टू काका काळाच्या पडद्याआड, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण, त्यांच्याऐवजी भागवत कराड यांची वर्णी लागली. प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे पंकजा मुंडे कमालीच्या नाराज झाल्या होत्या. त्यांच्या अनेक समर्थक आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. पंकजा मुंडे यांनीही दिल्लीवारी करून वरिष्ठांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी बोलून दाखवली होती. या घटनेनंतर पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस शक्यतो आमनेसामने आले नाही. आताही दोन्ही नेत्यांनी समोरासमोर येण्याचे टाळले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या