नाशिक, 03 नोव्हेंबर : पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol diesel price) गगनाला भिडले असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसली आहे. अखेर जनतेच्या रोषापुढे मोदी सरकारला (modi governmet) नरमाईची भूमिका घ्यावा लागली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. पण, आता पेट्रोल पंपचालकांची (petrolpump operators) डोकेदुखी वाढली आहे. अचानक झालेल्या कपातीमुळे पेट्रोलपंपचालकांचे मोठे नुकसान होणार आहे. . त्यामुळे पंपचालक बंद पुकारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे.पेट्रोल आण डिझेलचे दर अचानक कमी केल्याने पेट्रोल पंप चालक अडचणीत आहे.
दिवाळीचा सण असल्यामुळे तीन दिवस सुट्ट्या आल्या आहे. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी चढ्या दराने इंधन खरेदी केलं होतं. पण, आता पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. इतक्या मोठ्या फरकाने दर कमी झाल्याने पेट्रोल पंप चालकाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Team India मध्ये द्रविड पर्व! कोच झाल्यानंतर The Wall ची पहिली प्रतिक्रिया
'मोदी सरकारने नुकतेच हे धोरण जाहीर केले आहे. मागेही दरकपात झाली होती. त्यावेळी उत्पादन शुल्कात कपात झाल्यामुळे रिटेल दरावरही परिणाम झाला होता. पण, समजा त्यांनी जर तसे सांगितले असेल तर ग्राहकांसाठी फायदेशीर आहे. पण पेट्रोल पंपचालकांचा दिवाळीत दिवाळं निघणारा हा निर्णय आहे. हा निर्णय अत्यंत क्रुर आणि अविचारी आहे', अशी टीका फामफेडा राज्य संघटना पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी केली.
'पेट्रोल आणि डिझेलची दर ठरवण्याची जी पद्धत आहे, त्याला डीपीसी म्हणतात. आंतरराष्ट्रीय दरावर इंधनाचे रोजचे दर ठरत असतात. पण अचानक एवढा मोठा बदल होणार असेल तर तो निर्णय संपूर्णपणे राजकीय झाला आहे. याचा पेट्रोल दराशी कोणताही संबंध नाही. सरकारने डीलरचा विचार केला. दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे पंपचालकांनी टाक्या फूल केल्या आहे, आजचा लॉस आहे तो डीलरचा आहे, एकाच रात्रीत देशभरातील पेट्रोल पंपचालकांचं लाखोचं नुकसान होणार आहे. हे नुकसान भरून न येणारे आहे', असंही उदय लोध यांनी सांगितलं.
क्या बात है! लवकरच उभारली जाणार 'साई युनिव्हर्सिटी'; K. V. रामाणी करणार निर्माण
तसंच, 'एकतर 2017 पासून सरकारने कमिशन वाढवलेले नाही. त्याच्यात कोणताही निर्णय घेत नाही. आज अचानक सरकारने पेट्रोल कपातीचा निर्णय घेतला आहे, हे अत्यंत चुकीचं घडत आहे, असंही उदय लोध म्हणाले.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यासह देशातील पंप चालक बंद पुकारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय आहे मोदी सरकारचा निर्णय?
मोदी सरकारने दिवाळीची संधी साधत इंधनाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. उत्पादन शुल्क कर कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे. तसंच, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्यांनाही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट समान प्रमाणात कमी करण्याचे आवाहन सुद्धा मोदी सरकारने केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.