मुंबई, 13 सप्टेंबर : मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तर आपल्याला केवढा तरी मनस्ताप होतो. किंमती मोबाईल गेला की नुकसान होतं हे एक आणि त्यातला डेटाही मोबाईलबरोबर जातो तेव्हा हवालदिल व्हायला होतं. मोबाईलच्या किमतीपेक्षा कितीतरी जास्त आर्थिक नुकसान आणि वैयक्तिक माहिती, फोटो, कागदपत्रं लीक होण्याचा धोका असल्याने कायमचं टेन्शन डोक्यावर राहतं. पण आता हा धोका कमी होईल कारण तुमचा हरवलेला मोबाईल सरकार शोधून देईल. मंत्रीमहोदय शुक्रवारी यासंदर्भातलं वेब पोर्टल लाँच करणार आहेत. मोबाईल हरवल्यावर काय करायचं? मोबाईलची चोरी झाली किंवा मोबाईल हरवला तर काय करायचं? पहिल्यांदा पोलिसात तक्रार दाखल करायची. पोलिसांनी FIR नोंदवून घेतली की दूरसंचार विभागाला (DoT) Department of Telecommunication त्याची माहिती द्यायची. त्यासाठी 14422 हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. हे वाचा - आता खावा लागणार पाकिस्तानी कांदा, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना धक्का DoT गेली दोन वर्षं Central Equipment Identity Register (CEIR)म्हणजे तुमचा मोबाईल ओळखण्यासाठीच्या खास नंबरची नोंदणी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. इंटरनॅशन मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी IMEI निर्माण झाली की प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक 15 आकडी नंबर बहाल केला जाईल. तो फक्त त्या डिव्हाईसचा खास नंबर असेल. VIDEO : ‘सीएम गो बॅक’ म्हणत तरुणीने फेकला फडणवीसांच्या गाडीवर शाईचा फुगा देशातल्या कोट्यवधी मोबाईल यूजर्सना युनिक नंबर असेल. या देशव्यापी प्रोजेक्टची सुरुवात महाराष्ट्रापासून होणार आहे. रविशंकर प्रसाद मुंबईत या पायलट प्रोजेक्टची सुरुवात करतील. कसा सापडेल मोबाईल? मोबाईल फोन हरवला किंवा चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत केल्यानंतर 14422 या हेल्पलाईन नंबरला कळवायचं. IMEI नंबर ब्लॅकलिस्ट केला जाईल. त्यामुळे मोबाईल हँडसेट ब्लॉक होईल. कुठलंही सिमकार्ड त्या फोनवर चालणार नाही. म्हणजे हा फोनच निरुपयोगी ठरेल. ———————————————- VIDEO : मनसे निवडणूक लढवणार की नाही? बाळा नांदगावकर म्हणतात…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.